अतिक्रमण हटविण्याची कारवाई टाळण्यासाठी पेटवून घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू

By Admin | Published: May 12, 2017 03:45 PM2017-05-12T15:45:56+5:302017-05-12T15:48:34+5:30

पेटवून घेतलेल्या व्यक्तीचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़

Death of a person who has been set to avoid the action to be taken to remove encroachment | अतिक्रमण हटविण्याची कारवाई टाळण्यासाठी पेटवून घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू

अतिक्रमण हटविण्याची कारवाई टाळण्यासाठी पेटवून घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू

आॅनलाइन लोकमत
कोल्हार (अहमदनगर) दि़. १२ - अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्तात सुरु असलेली कारवाई स्थगित करावी व पत्राचे घर हटवू नये, या मागणीसाठी पेटवून घेतलेल्या व्यक्तीचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़
गळनिंब येथे गुरुवारी पोलीस बंदोबस्तात रस्त्याकडेचे अतिक्रमण हटविण्यात येते़ याच मार्गावर अनिल अंबादास कुलकर्णी (वय ६९) यांचे पत्र्याचे घर होते़ हे घर अतिक्रमणात येत होते़ त्यामुळे प्रशासनाने हे घरही हटविण्याची तयारी सुरु केली़ मात्र, कुलकर्णी यांनी ही कारवाई थांबविण्याची मागणी करीत स्वत:च्या घरात जाऊन अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले़ लोकांनी तातडीने कुलकर्णी यांना विझविले़ मात्र, तोपर्यंत आगीने ते प्रचंड भाजले होते़ त्यांना तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ रुग्णालय अधिकाऱ्यांनी कुलकर्णी हे ७० टक्के भाजले असल्याचे सांगितले़ शुक्रवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़

Web Title: Death of a person who has been set to avoid the action to be taken to remove encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.