विजेचा धक्का बसल्याने पोपट महाराज महाडीक यांचा मृत्यू, तालुक्यातील वारकरी संप्रदायावर शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 10:53 AM2020-06-21T10:53:29+5:302020-06-21T10:53:38+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील शेतकरी व वारकरी संपदायातील प्रख्यात प्रवचनकार ह .भ .प. पोपट महाराज महाडीक यांचा विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे ही घटना घडली.
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील शेतकरी व वारकरी संपदायातील प्रख्यात प्रवचनकार ह .भ .प. पोपट महाराज महाडीक यांचा विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे ही घटना घडली.
पोपट महाराज महाडीक ( वय ७० वर्ष ) हे पहाटे पाचच्या सुमारास भूईुमुगाच्या पिकाला पाणी देण्यासाठी विद्युतपंप चालू करण्यासाठी पहाटे विहीरीवर गेले होते. परंतू विहीरीजवळ त्यांना विजेचा धक्का बसला व बेशुद्ध पडले. त्यानंतर बºयाच वेळाने त्यांचा पुतण्या तेथे गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांना शिरूर येथे हलविण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.
महाडीक महाराजांनी गेल्या चाळीस वषार्पासून वारकरी संप्रदायाची सेवा करताना गावोगावी जाऊन कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती केली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा दोन मुली असा परिवार आहे. पोपटराव महाडीक यांच्या दुदैर्वी निधनाची बातमी श्रीगोंदा शिरुर पारनेर तालुक्यात वाºयायासारखी पसरली आहे.अनेकांनी हळहळ व्यक्त केली
--
परिस्थिती गरिबीची असली तरी मुलगा व मुलींना उच्च शिक्षण देऊन सॉफ्टवेअर इंजिनिअर बनवले आहे. मोठी मुलगी सध्या अमेरीकेत नोकरीला आहे. अत्यंत शांत व मनामिळाऊ स्वभावाचे असणारे महाराज त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.