शिर्डीतील मरण होणार सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:23 AM2021-01-16T04:23:30+5:302021-01-16T04:23:30+5:30

याबाबतच्या खर्चासाठी वार्षिक अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. गोंदकर म्हणाले, शासनाच्या नियमाच्या चौकटीत राहून या योजनेची अंमलबजावणी व्हावी. यासाठी ...

Death in Shirdi will be pleasant | शिर्डीतील मरण होणार सुखकर

शिर्डीतील मरण होणार सुखकर

याबाबतच्या खर्चासाठी वार्षिक अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

गोंदकर म्हणाले, शासनाच्या नियमाच्या चौकटीत राहून या योजनेची अंमलबजावणी व्हावी. यासाठी आमदार राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे यांच्याशीही चर्चा केली. नगरपंचायतीच्या माध्यमातून रस्ते, पाणी, स्वच्छता या मुलभूत कामांबरोबरच सर्वसामान्य शिर्डीकरांच्या हिताच्या काही वेगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला. मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, उपनगराध्यक्ष सचिन कोते सहकार्य केल्यामुळेच हा निर्णय होऊ शकला. नगरपंचायतीने घेतलेला हा निर्णय माणुसकीची भावना दर्शवणारा आहे, असे डॉ. मंगेश गुजराथी यांनी सांगितले.

.................

निर्णयाचे केले स्वागत

नगरपंचायतचा निर्णय शहरातील गोरगरीब जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक नितीन शेळके यांनी व्यक्त केली.

माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर, माजी नगरसेवक देवानंद शेजवळ, देवराम सजन, शिर्डी दूध डेअरीचे बाळासाहेब जगताप, भास्कर कोते, संदीप पारख, केशव गायके, विनायक रत्नपारखी यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

Web Title: Death in Shirdi will be pleasant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.