न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रशासकाबाबत निर्णय; हसन मुश्रीफ यांची माहिती, अण्णा हजारे यांची घेतली राळेगणसिद्धीत भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:47 PM2020-07-25T12:47:42+5:302020-07-25T12:48:26+5:30
ग्रामपंचायतींवर नेमण्यात येणा-या प्रशासकासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यावर सोमवारी अंतिम निर्णय होणार आहे. या निर्णयानंतरच प्रशासकासंदर्भात शासन निर्णय घेईल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी राळेगणसिध्दीत (२४ जुलै) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पारनेर : ग्रामपंचायतींवर नेमण्यात येणा-या प्रशासकासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यावर सोमवारी अंतिम निर्णय होणार आहे. या निर्णयानंतरच प्रशासकासंदर्भात शासन निर्णय घेईल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी राळेगणसिध्दीत (२४ जुलै) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, मंत्री मुश्रीफ यांच्या भेटीनंतर आपले निम्मे समाधान झाले आहे, अंमलबजावणीनंतर निम्मे होईल, असे अण्णा हजारे यांनी यावेळी स्पष्ट केले.
अण्णा हजारे-हसन मुश्रीफ, आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यात सुमारे अर्धा तास झालेल्या चर्चेदरम्यान ग्रामपंचायतीवर नेमण्यात येणारे प्रशासक तसेच ग्रामविकासावर प्रामुख्याने चर्चा झाली.
ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून सरकारी अधिकारी नेमल्यानंतर पुढे काय करायचे यावर सोमवारी न्यायालय निर्णय देणार आहे. त्यानंतरच शासन यावर निर्णय घेईल. उच्च न्यायालयात झालेल्या कामकाजाची माहिती हजारे यांना देण्यात आल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.