राहाता शहरात जनता कर्फ्यूचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:14 AM2021-06-11T04:14:42+5:302021-06-11T04:14:42+5:30

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने व एकमताने जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. व्यापारी असोसिएशनच्या वतीने नगराध्यक्षा पिपाडा ...

Decision of public curfew in Rahata city | राहाता शहरात जनता कर्फ्यूचा निर्णय

राहाता शहरात जनता कर्फ्यूचा निर्णय

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने व एकमताने जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. व्यापारी असोसिएशनच्या वतीने नगराध्यक्षा पिपाडा व मुख्याधिकारी चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी काळजी घेतली नाही तर धोका होण्याचा संभव आहे. राहाता शहरात नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी जनता कर्फ्यू सर्वांनी पाळावा, असे निवेदनात म्हटले आहे. डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी कोरोनाच्या रुग्णांना मानसिक आधार दिला तसेच ऑक्सिजन उपलब्धता, रुग्णालयात भरती होण्यासाठी रुग्णांना सहकार्य केल्याचे सांगितले. यावेळी विजय सदाफळ, गणेश सोमवंशी, विजय मोगले, दशरथ तुपे, वीरेश रुणवाल यांनी मनोगत व्यक्त केले.

------

Web Title: Decision of public curfew in Rahata city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.