भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय माझाच : आमदार संग्राम जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:23 PM2018-12-29T13:23:33+5:302018-12-29T13:36:59+5:30
शिवसेनेच्या काळात नगर शहराचा विकास खुंटला आहे.
भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय माझाच : आमदार संग्राम जगताप
अहमदनगर : शिवसेनेच्या काळात नगर शहराचा विकास खुंटला आहे. सध्या राज्यात आणि देशात भाजपाची सत्ता असल्याने शहरविकासाकरीता निधी मिळण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय मी आणि पक्षाचे नगरसेवकांनी मिळून घेतला आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. पत्रकारांशी संवाद साधताना हा खुलासा त्यांनी केला.
जगताप म्हणाले, पक्षाने खुलासा मागितला असला तर योग्य तो खुलासा देईल. भाजपला हा बाहेरून पाठिंबा आहे. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार नाही. केवळ भाजपवर अंकुश ठेवेल. छिंदम - बोराटे क्लिप प्रकरणी सखोल चौकशी व्हावी. बाबासाहेब वाकळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही, कारण ती आमची जागा नव्हती.
वडीलांचाही निर्णयाशी कोणताही संबध नाही
विधान परिषेदेचे आमदार माझे वडील अरुण जगताप यांचा सुद्धा निर्णयाशी कोणताही संबध नाही. मी भाजपमध्ये जाणार नसून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे.
फाळके आणि कळमकर यांचे आरोप बिनबुडाचे
जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर यांनी आमच्यावर आरोप केले आहेत. मात्र त्यांची व माझी कोणतीही चर्चा झाली नव्हती. हा निर्णय फक्त माझा व नगरसेवकांचा निर्णय आहे.