७० टक्के मागण्यांवर सकारात्मक विचार केल्यामुळे पुणतांब्यातील आंदोलन थांबविण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 02:11 PM2022-06-09T14:11:11+5:302022-06-09T14:11:16+5:30
या ग्रामसभेला किसान क्रांती कोअर कमिटी, गावातील नागरिक, नायब तहसीलदार, तलाठी,कृषी सहायक, ग्रामविकास अधिकारीयांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पुणतांबा: (मधु ओझा )/ पुणतांबा येथील १ जून पासून सुरू झालेले धरणे आंदोलन आजच्या ग्रामसभेत थांबवण्यात आले असल्याचे कोअर कमिटी मार्फत आजच्या ग्रामसभेत ठरविण्यात आले.
पुणतांबा येथील ग्रामसचिवालयाच्या सभागृहात झालेल्या आजच्या ग्रामसभेत कोअर कमिटीने १६ पैकी ०९ मागण्याचा सकारात्मक विचार झाल्याने पुढील आंदोलन थांबविण्यात आले, असून मिळालेल्या आश्वासनांचा पाठपुरावा करणार असून जर त्यावर ठोस निर्णय झाला नाही. तर तीन महिन्यानंतर पुन्हा आंदोलन करणार. तर पुन्हा एकदा तीन महिन्याचे अल्टिमेट देण्यात आले आहे.
या ग्रामसभेला किसान क्रांती कोअर कमिटी, गावातील नागरिक, नायब तहसीलदार, तलाठी,कृषी सहायक, ग्रामविकास अधिकारीयांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.