मुंबईपुरतेच निर्णय घेऊन ग्रामीण महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:47+5:302021-05-31T04:16:47+5:30
मानवतेच्या दृष्टिकोनातून सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोविड संकटात केलेल्या निरपेक्ष कामामुळेच सामान्य माणसाला आधार वाटल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. शिर्डी ...
मानवतेच्या दृष्टिकोनातून सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोविड संकटात केलेल्या निरपेक्ष कामामुळेच सामान्य माणसाला आधार वाटल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. शिर्डी विधानसभा मतदारसंघात कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देणाऱ्या सरकारी वैद्यकीय अधिकारी, खासगी रुग्णालयांतील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिकाचालक, सफाई कामगार, आशासेविका आणि नर्सिंग स्टाफचा कोविडयोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने सेवा ही संघटन या उपक्रमातून गाव पातळीवर आरोग्य सेवांचे उपक्रम तसेच कोविडयोद्ध्यांना सन्मानित करण्यात आले.
साई संस्थान रुग्णालयातील डॉक्टरांसह पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ तसेच लॅब टेक्निशियन यांना आमदार विखे यांच्या हस्ते शाल आणि कृतज्ञता सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, कैलास कोते, अभय शेळके, प्रतापराव जगताप, नितीन कोते, अशोक गायके, सुजित गोंदकर, रवि कोते, स्वानंद रासणे, भाजयुमोचे सतीश बावके, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, साईसंस्थानचे डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, डॉ. प्रितम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे, डॉ. ओंकार जोशी उपस्थित होते.