राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिन मातृसत्ताक दिन म्हणून घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:53 AM2021-01-13T04:53:56+5:302021-01-13T04:53:56+5:30
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक दशरथ गव्हाणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठविले. राज्यासह देशभरात विविध ...
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक दशरथ गव्हाणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठविले. राज्यासह देशभरात विविध महापुरुष तसेच देशाच्या जडणघडणीत स्वातंत्र्योत्तर व स्वातंत्र्यपूर्व काळात अनमोल योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक विविध नेते, महापुरुष यांचे दिनविशेष साजरे केले जातात. आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस १२ जानेवारी हा मातृसत्ताक दिन अथवा संस्कार दिन म्हणून शासनस्तरावर साजरा करण्यात यावा. शासनाच्या वतीने या दिनाला विशेष महत्त्व प्राप्त करून द्यावे. आमच्या मागणीचा व भावनांचा विचार करून हा दिवस मातृसत्ताक दिन म्हणून घोषित करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक दशरथ सोपानराव गव्हाणे यांनी निवेदनात केली आहे.