सरकारच्या महसुलात होणारी घट देशावरील कर्ज वाढवणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:21 AM2021-02-10T04:21:31+5:302021-02-10T04:21:31+5:30
अहमदनगर : अहमदनगर कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘अर्थसंकल्प २०२१’ या विषयावर ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ...
अहमदनगर : अहमदनगर कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘अर्थसंकल्प २०२१’ या विषयावर ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठचे प्रमुख डॉ. प्रमोद लोणकर व्याख्याते म्हणून उपस्थित होते.
विभागप्रमुख डॉ. पराग कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. अर्थसंकल्प म्हणजे काय? अर्थसंकल्प तयार करण्याच्या पद्धती, अर्थसंकल्प तयार करताना कोणती काळजी घेतली जाते? यासारख्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करत लोणारकर यांनी सरकारच्या महसूल आणि खर्च यावर विस्ताराने भाष्य केले. या वर्षात आणि पुढील वित्तीय वर्षातही सरकारचा महसूल घटणार असल्याने सरकारवरील कर्ज मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थिनी अपूर्वा लहाडे, श्वेता यादव, अपेक्षा फासले यांनी अर्थसंकल्पावर सादरीकरण केले. या परिसंवादासाठी जगन्नाथ गव्हाणे, डॉ. परमेश्वर गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पराग कदम यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. माधव शिंदे यांनी, तर आभार डॉ. भागवत परकाळ यांनी मानले.
-------
फोटो - ०९नगर कालेज
अहमदनगर कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘अर्थसंकल्प’ या विषयावर ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.