दीपक पेट्रोल पंपावर अरेरावी : उपअधीक्षकांना धक्काबुक्की : ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 04:38 PM2019-05-02T16:38:51+5:302019-05-02T16:39:13+5:30

सावेडीतील दीपक पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल भरण्याच्या वादातूून उपअधीक्षक संदीप मिटके व अन्य एका पोलीस कर्मचा-याला शिवीगाळ, धक्काबुक्की केली.

Deepak petrol pumps on the uproar: Deputy Superintendent of Police: FIR against 11 accused | दीपक पेट्रोल पंपावर अरेरावी : उपअधीक्षकांना धक्काबुक्की : ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

दीपक पेट्रोल पंपावर अरेरावी : उपअधीक्षकांना धक्काबुक्की : ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर : सावेडीतील दीपक पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल भरण्याच्या वादातूून उपअधीक्षक संदीप मिटके व अन्य एका पोलीस कर्मचा-याला शिवीगाळ, धक्काबुक्की केली. याप्रकरणी एकूण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, दोघांना अटक केली आहे. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी गणेश चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. चव्हाण व उपअधीक्षक मिटके हे बुधवारी (दि. १) रात्री साडेदहाच्या सुमारास खासगी कामानिमित्त दुचाकीवर (एमएच २६ बीएफ १५९०) प्रोफेसर चौकात गेले होते. तेथून परत पोलीस मुख्यालयाकडे जात असताना झोपडी कॅन्टीनलगच्या दीपक पेट्रोलपंपावर ते पेट्रोल भरण्यासाठी थांबले. १०० रूपयांचे पेट्रोल टाकल्यानंतर चव्हाण यांनी आणखी १०० रूपयांचे पेट्रोल टाकण्यास पंप कर्मचाºयाला सांगितले. परंतु त्या कर्मचाºयाने मीटरवर आधीचाच आकडा दाखवून पेट्रोल टाकल्याचे भासवले. चव्हाण यांनी त्यास याचा जाब विचारला असता, कर्मचाºयाने अरेरावीची भाषा वापरली. त्यावर चव्हाण यांनी पंपाच्या मॅनेजरला हा प्रकार सांगितला, परंतु मॅनेजरनेही आमच्याकडे असे प्रकार होत नसल्याचे सांगितले. त्यावर चव्हाण यांनी आम्हाला दुचाकीच्या टाकीतील पेट्रोल मोजून द्या, असे सांगताच पंपावरील सर्वच कर्मचारी जमा झाले व त्यांनी चव्हाण यांच्याशी अरेरावी केली. त्यावेळी उपअधीक्षक मिटके यांनी त्या कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही अरेरावी, शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली.
हा प्रकार पाहून तेथे नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान, पेट्रोलिंगकरिता असलेले पोलीस तेथे आले. पोलीस आल्याचे पाहून कर्मचारी पळून गेले. परंतु त्यावेळी पेट्रोल भरणारा कर्मचारी आकाश चंद्रकांत आल्हाट (वय २६, सिद्धार्थनगर) व मॅनेजर गोरख लक्ष्मण ठाकूर (वय २६, भिंगार) यांना मात्र पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे इतरांची नावे विचारली असता, सचिन थोरात, किरण नेटके, अक्षरा सावळे, प्रकाश कनोजिया, शाहरूख पठाण, आॅगस्टिन जी, आकाश बीडकर, बॉबी साळवे, असाद अशी नावे समजली. या सर्वांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Deepak petrol pumps on the uproar: Deputy Superintendent of Police: FIR against 11 accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.