माध्यमिक शिक्षण विभागात दप्तर दिरंगाई, शिक्षकांना आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 01:30 PM2020-09-09T13:30:04+5:302020-09-09T13:35:59+5:30
केडगाव : शासनाचे कोणतेही आर्थिक निर्बंध नसताना केवळ माध्यमिक शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे मे महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या २५६ माध्यमिक शिक्षकांना नाहक आर्थिक फटका बसला असुन याची चौकशी करून वारवाईची मागणी माध्यमिक शिक्षक संघटनेने केली आहे .
केडगाव : शासनाचे कोणतेही आर्थिक निर्बंध नसताना केवळ माध्यमिक शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे मे महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या २५६ माध्यमिक शिक्षकांना नाहक आर्थिक फटका बसला असुन याची चौकशी करून वारवाईची मागणी माध्यमिक शिक्षक संघटनेने केली आहे.
याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले . त्यात म्हटले आहे की , मे महिन्यात २५६ शिक्षक निवृत्त झाले. त्यांना ३२ कोटी रूपये भविष्य निर्वाह निधीची रक्कम सुमारे अडिच महिन्यानंतर अदा झाली.
शिक्षकांचे ३२ कोटीवरील दोन महिन्यांचे ४ङ्म लाखांचे व्याज बुडाले. याची जबाबदारी संबधितांवर निश्चित करून शिक्षकांच्या आर्थिक नुकसानीची वसुली व्हावी अशी मागणी अध्यक्ष राजेंद्र लांडे सचिव आप्पासाहेब शिंदे , गोरक्षनाथ ठोंबरे , हरिश्चंद्र नलगे, विजय थोरात , नानासाहेब सुद्रिक, मकरंद कोऱ्हाळकर यांनी केली आहे.