आजीचा बटवा अन् कोरोनाला हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:20 AM2021-05-24T04:20:34+5:302021-05-24T04:20:34+5:30

केडगाव : सध्या सगळीकडेच कोरोनाचा विळखा पडला आहे. सर्दी, खोकला, ताप अशी सामान्य लक्षणे असणारे घरच्या घरी औषधे घेऊन ...

Delete Grandma's wallet Uncorona | आजीचा बटवा अन् कोरोनाला हटवा

आजीचा बटवा अन् कोरोनाला हटवा

केडगाव : सध्या सगळीकडेच कोरोनाचा विळखा पडला आहे. सर्दी, खोकला, ताप अशी सामान्य लक्षणे असणारे घरच्या घरी औषधे घेऊन नीट झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच घरगुती उपाय करून प्रतिकार शक्ती वाढवण्याकडे अनेकांचा कल सुरू आहे. अशा कठीण काळात आजीच्या बटव्यातील घरगुती उपाय बहुतांशी रुग्णांना संजीवनी ठरत आहेत. कोरोना काळात आजीच्या बटव्याने अनेकांना मायेची आणि मोलाची साथ दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४६ हजार ६६५ रुग्ण झाले असून सध्या १६ हजार ३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २ लाख २७ हजार ६०४ रुग्ण बरे झाले. २ हजार ७४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

---

ताप-सर्दी आली की सतापाचा............. पाला द्यायचा, खोकला व त्यामुळे कफ झाला की घरातील हुलगे (कुळीथ ) भाजून दळून त्याचे माडगे बनवायचे. त्याचा रसा पिण्यास दिल्यामुळे छातीत साठलेला कफ मोकळा होत असे. त्याचप्रमाणे खोकल्यासाठी गूळ व हळद व मध एकत्र करून त्याच्या गोळ्या दिल्याने खोकला कमी होत असे. पोटदुखीवर कडू इंद्रवण, कोरफडीचा गर बहू गुणकारी आहे. अंगावर गांधाडे आल्यास मिरी वाटून ती तुपात एकत्र करून त्याचा लेप लावल्यास पित्तमुळे येणारी गांधाडे कमी होतात.

-द्वारकाबाई पवार,

वय ७०, साकत, नगर

-----झाडपाल्याच्या औषधाला प्राचीन काळापासून चांगली ओळख आहे. माझ्याकडे दाढदुखी, शुगर, मूळव्याध असणारे अनेक रुग्ण येतात. झाडपाला, औषधी वनस्पतीमुळे विविध आजार बरे झाल्याचे रुग्ण सांगतात. कोरोनावर निश्चित औषध नसल्याने प्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. गुळवेल, शिंदाड माकड, कडुलिंब, अडुळसा, आवळा, पळस, कोरफड या वनस्पतींचा काढा हा प्रतिकार शक्ती वाढविण्याबरोबरच विविध आजारांवर गुणकारी आहे. अनेकांना तो गुणकारी ठरला.

-कौसल्या गोविंद शेटे,

वय ७५, जेऊर, नगर

---

वयाच्या बाराव्या वर्षापासून बटवा वापरत आहे. जुन्या काळी गावोगावप फिरणाऱ्या वैद्य महिलांकडून बिबा, कवडी, लिंबू व झाडपाल्याची औषधे यात असायची. आजही माझ्या बटव्यामधे जायफळ, सुंठ, विलायची, आवळा, लवंग यासारख्या वस्तू असून खोकला आला तर त्याचा काढा करून देते.

-जिजाबाई निवृत्ती लहारे,

वय ८६, पिंपळगाव माळवी, नगर

----

चौकट : कशाचा काय फायदा?

१) हळदीचा काढा

हळद, काढा, आयुर्वेदिक औषधे सध्या परवलीचे शब्द झालेत. तुमच्यापैकी अनेक जण रोज रात्री दूध-हळद घेतल्याशिवाय झोपत नसतील.

आयुर्वेदाच्या परंपरागत उपचार पद्धतीत हळदीचा वापर अनेक शतकांपासून होतोय. मानवी शरीरात तीन तऱ्हेच्या प्रवृत्ती आहेत-वात, पित्त आणि कफ असे आयुर्वेद म्हणते आणि हळद ही एकमेव औषधी वनस्पती आहे, जी या तिन्ही प्रकारच्या दोषांना बरे करते. असेही मानले जाते की, हळदीत अँटिऑक्सिडंट आणि अँटिसेप्टिक गुणधर्म असतात. यामुळे कोरोनासारख्या आजारातही हळदीचा काढा गुणकारी मानला जातो. फक्त औषधी गुणधर्मच नाही तर हळदीचे स्थान भारतीय स्वयंपाकघरात अढळ आहे.

२) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

एडनबर्ग युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर अजिज शेख यांच्या अभ्यासानुसार मिठाच्या पाण्याने नियमित गुळण्या केल्याने कोरोनाची लक्षणे कमी केली जाऊ शकतात. त्यामुळे कुणाला कोरोनाची लागण झाली असेल आणि कोरोनाची कमी लक्षणे असतील त्यांच्यासाठी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या फायदेशीर असल्याचे या अभ्यासकांचे म्हणणे आहे. जेव्हा कोरोना संसर्ग हा श्वासनलिकांवर असतो तेेव्हा मीठ कोरोना व्हायरसवर विषाचं काम करतो. प्रोफेसर अजिज यांच्या माहितीप्रमाणे जेव्हा कोरोना मिठाच्या संपर्कात येतो तेव्हा मीठ कोरोनासाठी जहर म्हणून काम करतो. सोबतच मिठाच्या पाण्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतादेखील वाढते. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने श्वास नलिकेतील रोगप्रतिकारक क्षमता व्हायरसवर हल्ला करून त्याला संपवायला सुरवात करते.

३) अद्रकचा रस

आले मसाल्यामधील महत्त्वाचा घटक. सर्दी, खोकल्यावरील औषध. आल्यामध्ये अनेक पोषक तत्त्वे असून ते आरोग्यवर्धक आहे. बायोॲक्टिव्ह युक्त आले असते. आल्याचे गुणधर्म आरोग्याला अधिक उपयुक्त आहेत. आले हे औषधी आहे. यातील फेनोलिकमुळे अपचन तसेच जलन याला आराम मिळतो. पित्त होण्यापासून रोखले जाते. आले वेदनाशामक, तापमान कमी करणारे आहे. जिंगेरॉलपेक्षा झिंगेरॉन हे कमी वासाचे व गोडसर वासाचे आहे. आल्यामुळे तोंडात लाळेची निर्मिती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे घास गिळायला सोपे जाते.

चौकट : घरगुती काढ्याचे उपयोग व पद्धती

कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने नैसर्गिक पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. विशेष म्हणजे घरच्या घरी आणि घरी असलेल्या साहित्याच्या मदतीने आपण काढा तयार करू शकतो. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

काढ्यासाठी लागणारे साहित्य -तुळशीचे पाने, दालचिनी, सुंठ, काळे मिरे हे सर्व एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून ४ ग्रॅमची टी-बॅग किंवा ५०० मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या तयार करा. दिवसातून एक किंवा दोन वेळा याला १५० मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखे प्या. ताप किंवा सर्दी असेल तर तुम्ही हा काढा दिवसातून चार वेळा घेऊ शकतात.

जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही काढा पिऊ नये. यामुळे नाकातून रक्तस्राव होऊ शकतो आणि आपण मोठ्या समस्येत अडकू शकाल. काढ्यात मसाल्याच्या पदार्थांचा समावेश असतो. अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता इंटरनेटवर पाहून घरी काढा तयार करत आहेत. पण त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. काळी मिरी, दालचिनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.

--

कोरोनामध्ये वाफ घेतल्यामुळे श्वसन संस्थेमधील व नाकाजवळील sinuses open होऊन चिकटलेला कफ मोकळा होण्यास मदत होते व लक्षण स्वरूपातील खोकला कमी होतो. तसेच कोमट पाण्याच्या गुळण्या केल्याने घशाची सूज व कोरडेपणा कमी होऊन लक्षणे कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निरनिराळे काढे घेतल्यास त्याने श्वसन संस्थेस बळ मिळाल्याने आजार होण्यास प्रतिबंध होऊ शकतो किंवा आजार झाल्यावर त्याची तीव्रता कमी असू शकते.

-डॉ. सचिन आहेर

केडगाव

230521\img-20210523-wa0174.jpg~230521\img-20210523-wa0144.jpg~230521\img-20210523-wa0141.jpg

लहारे~शेटे~????

Web Title: Delete Grandma's wallet Uncorona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.