फसवणुक करणा-या जामखेड नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिका-यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 06:25 PM2018-05-19T18:25:03+5:302018-05-19T18:25:39+5:30

जामखेड नगर परिषदच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचा-यांनी संगनमत करुन सुमारे १२० आरोग्य कर्मचा-यांची आर्थिक फसवणुक केल्याबद्दल संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी जामखेडच्या जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार महेंद्र पाखरे यांना देण्यात आले.

Demand for action against senior officials of Jamkhed Municipal Council who are doing fraud | फसवणुक करणा-या जामखेड नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिका-यांवर कारवाईची मागणी

फसवणुक करणा-या जामखेड नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिका-यांवर कारवाईची मागणी

अहमदनगर : जामखेड नगर परिषदच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचा-यांनी संगनमत करुन सुमारे १२० आरोग्य कर्मचा-यांची आर्थिक फसवणुक केल्याबद्दल संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी जामखेडच्या जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार महेंद्र पाखरे यांना देण्यात आले.
जामखेड नगर परिषदने आरोग्य कर्मचा-यांचे किमान वेतन व महागाई फरकाची चोपन्न हजार सहाशे रुपये रक्कम प्रत्येक कर्मचा-यांच्या महाराष्ट्र बँकेच्या जामखेड शाखेत जमा केलेली आहे. २० एप्रिल रोजी जामखेड नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिका-याने व काही कर्मचा-यांच्या संगनमताने सुमारे १२० आरोग्य कर्मचा-यांची फसवणुक करुन सही व अंगठे घेतले. सदरील बँक मॅनेजरला हाताशी धरुन या कर्मचा-यांच्या बँक खात्यातून सहा हजार तर काही कर्मचा-यांच्या खात्यातून पंधरा हजार रुपयाची रक्कम परस्पर काढण्यात आली. याद्वारे आरोग्य कर्मचा-यांची फसवणुक करुन तेरा लाख रुपयाचा अपहार करण्यात आलेला आहे. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला लेखी फिर्याद देखील दिलेली आहे.
या घटनेची चौकशी करुन फसवणुक करणा-यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा संघटनेच्या माध्यमातून फसवणुक झालेले सर्व शोषित कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सिध्दार्थ घायतडक, मधुकर राळेभात, नामदेव राळेभात, अवधुत पवार, गोरख दळवी, विजय गायकवाड, बाबासाहेब ओहोळ, मिलिंद घायतडक, लक्ष्मण घायतडक, रामदास गायकवाड, राजेंद्र माने, मधुकर निकाळजे, दिलीप डाडर, कल्याण काळे आदिंसह जामखेड नगरपरिषदचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Demand for action against senior officials of Jamkhed Municipal Council who are doing fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.