शेवगावच्या पुरवठा निरीक्षकावर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:46 AM2020-12-11T04:46:47+5:302020-12-11T04:46:47+5:30

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिघोत यांनी बोगस चारित्र्य पडताळणीचे कागदपत्र देऊन नोकरी मिळवल्याचा आरोप नागरिकांनी ...

Demand for action against Shevgaon supply inspector | शेवगावच्या पुरवठा निरीक्षकावर कारवाईची मागणी

शेवगावच्या पुरवठा निरीक्षकावर कारवाईची मागणी

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिघोत यांनी बोगस चारित्र्य पडताळणीचे कागदपत्र देऊन नोकरी मिळवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी उपोषण करण्यात आले.

याप्रकरणी तक्रारदार संकेत कळकुंबे व मीनाक्षी कळकुंबे यांनी उपोषण केले. या उपोषणाला जय भगवान महासंघ व रिपब्लिकन पार्टीच्या (गवई गट) वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी जय भगवान महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सानप, प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे, जिल्हाध्यक्ष रमेश सानप, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, संतोष पाडळे, पोलीस बॉईज असोसिएशनचे नितीन खंडागळे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सोनू शिंदे, हरिभाऊ डोळसे, कैलास गर्जे, मदन पालवे, प्रवीण नाईक, अल्ताफ शेख, पवन भिंगारदिवे सहभागी झाले होते.

शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिघोत यांनी खरी माहिती लपवून स्वतःची बोगस चारित्र्य पडताळणी करून घेतलेली आहे. पुरवठा निरीक्षक पदावर रुजू होण्यापूर्वी बिघोत यांच्यावर १७ सप्टेंबर २०१६ रोजी फसवणूक प्रकरणी सिडको (जि. औरंगाबाद) येथे गुन्हा दाखल झालेला आहे. बिघोत यांना बडतर्फ करण्याच्या कारवाईचा आदेश विभागीय आयुक्तांनी देऊनही सदर आदेशाची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाकडून झाली नसल्याने हे उपोषण करण्यात आले आहे.

---------------

फोटो- १० उपोषण

शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षकावर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषणाला बसलेले तक्रारदार संकेत व मीनाक्षी काळकुंबे. समवेत आनंद लहामगे आदी.

Web Title: Demand for action against Shevgaon supply inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.