लसीकरण केंद्रांवर पोलीस नियुक्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:21 AM2021-05-13T04:21:42+5:302021-05-13T04:21:42+5:30
.... नऊ केंद्रांवर आज दुसरा डोस अहमदनगर : महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रांसह आयुर्वेद महाविद्यालय आणि भिंगार छावणी परिषद अशा ...
....
नऊ केंद्रांवर आज दुसरा डोस
अहमदनगर : महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रांसह आयुर्वेद महाविद्यालय आणि भिंगार छावणी परिषद अशा नऊ लसीकरण केंद्रांवर गुरुवारी प्रत्येकी शंभर जणांना यादीनुसार लस दिली जाणार आहे. ४५ ते ६० वयोगटातील ज्या नागरिकांचे यादीत नाव आहे, अशा नागरिकांनीच फक्त लस घेण्यासाठी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
.....
रक्तपेढी चालकांची बैठक
अहमदनगर : कोरोना रुग्णांंना रक्ताची गरज भासत आहे. परंतु, रक्ताचा तुटवडा असल्याने महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांनी शहरातील सर्व रक्तपेढी चालकांची बैठक बोलाविली असून, या बैठकीत रक्त पुरवठा करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.
....
देशपांडे रुग्णालयातील लसीकरणासाठी फोन
अहमदनगर : महापालिकेच्या संकेतस्थळावर बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात लस उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली गेली आहे. प्रत्यक्षात मात्र या रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. बुधवारी नागरिकांनी रुग्णालयात फोन करून, लस देण्याची मागणी केल्याने एकाच गोंधळ उडाला होता.
....
घर घर ऑक्सिजन लंगर सेवा
अहमदनगर : गुरू अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान व महापालिका आणि अहमदनगर पोलीस, तसेच लायन्स क्लबच्या संंयुक्त विद्यमाने विनामूल्य घर घर ऑक्सिजन लंगर सेवा सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना जोपर्यंत ऑक्सिजनचे बेड मिळत नाहीत, तोपर्यंत विनामूल्य ऑक्सिजन कॅन पुरविला जाणार असून, गरजूंनी अशोका हॉटेल येथील लंगर सेवा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन घर घर लंगर सेवेच्यावतीने करण्यात आले आहे.
....