भुईकोट किल्ला जॉगिंग ट्रॅकच्या साफसफाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:19 AM2021-01-22T04:19:49+5:302021-01-22T04:19:49+5:30
अहमदनगर : भुईकोट किल्ला परिसरातील जॉगिंग ट्रॅक साफसफाई करण्याच्या मागणीसाठी जनआधार सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. ...
अहमदनगर : भुईकोट किल्ला परिसरातील जॉगिंग ट्रॅक साफसफाई करण्याच्या मागणीसाठी जनआधार सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, शहराध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हाध्यक्ष अमोल भंडारे, मच्छिंद्र गांगर्डे, संतोष उदमले, अमित गांधी, दीपक गुगळे, शहबाज शेख, संतोष त्रिंबके, सुशील साळवे, लक्ष्मण साळे, बाळासाहेब धीवर, शाहिद सय्यद, वसीम शेख, श्रीपाद वाघमारे, किरण जावळे, संतोष टेमक आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. कोरोना काळादरम्यान प्रशासनाने सर्वच सार्वजनिक ठिकाणासह जॉगिंग ट्रॅकवर गर्दी होऊ नये, यासाठी काही महिन्यांपूर्वी सर्व ठिकाणे बंद केली. परिणामी, अहमदनगर शहरातील सर्वात मोठा जॉगिंग ट्रॅक असलेले भुईकोट किल्ला परिसरात शासनाने नव्याने तयार केलेला जॉगिंग ट्रॅक शहरापासून अगदी जवळ आणि निसर्गरम्य ठिकाण असल्याने या ट्रॅकवर अनेक लोक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, तसेच फेरफटका मारण्यासाठी येत असतात; परंतु अनेक दिवसांपासून बंद असल्याने त्याच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी, या सर्व भागात गवत तसेच झाडाझुडपांचे साम्राज्य निर्माण होऊन ट्रॅकची दुरवस्था झालेली आहे. या कोरोना परिस्थितीमध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवू नये, तसेच आरोग्य उत्तम राहण्यासाठी अनेक जण या ट्रॅकवर येत असतात. त्यामुळे तो ट्रॅक लवकरात लवकर व्यवस्थित करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
---------
फोटो - २०जनआधार
भुईकोट किल्ला परिसरातील जॉगिंग ट्रॅक साफसफाई करण्याच्या मागणीसाठी जनआधार सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.