जामखेडमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास एटीएसकडे द्यावा - दिलीप वळसे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 07:58 PM2018-05-02T19:58:54+5:302018-05-02T20:00:58+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश ऊर्फ रॉकी राळेभात या दोघांची २८ एप्रिल रोजी हत्या झाली. तीन महिन्यांपूर्वी भरदिवसा रस्त्यात झालेल्या गोळीबारात दोघेजण गंभीर जखमी झाले. या दोन्ही घटना पाहता घटनेतील आरोपी सत्तारूढ पक्षाशी संबंधित आहे. जामखेड येथे तीन वर्षांत बारा पोलीस अधिकारी बदलले. यावरून घडलेल्या घटनेचा तपास कार्यक्षमपणे पोलीस करू शकणार नाहीत. त्यामुळे राळेभात बंधुच्या हत्याकांडाचा तपास एटीएसमार्फत करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे यांनी केली.

Demand of double murder of NCP workers in Jamshed district should be given to ATS - Dilip Walse's demand | जामखेडमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास एटीएसकडे द्यावा - दिलीप वळसे यांची मागणी

जामखेडमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास एटीएसकडे द्यावा - दिलीप वळसे यांची मागणी

जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश ऊर्फ रॉकी राळेभात या दोघांची २८ एप्रिल रोजी हत्या झाली. तीन महिन्यांपूर्वी भरदिवसा रस्त्यात झालेल्या गोळीबारात दोघेजण गंभीर जखमी झाले. या दोन्ही घटना पाहता घटनेतील आरोपी सत्तारूढ पक्षाशी संबंधित आहे. जामखेड येथे तीन वर्षांत बारा पोलीस अधिकारी बदलले. यावरून घडलेल्या घटनेचा तपास कार्यक्षमपणे पोलीस करू शकणार नाहीत. त्यामुळे राळेभात बंधुच्या हत्याकांडाचा तपास एटीएसमार्फत करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे यांनी केली.

योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या कुटुंबियांचे सात्वंन केल्यानंतर वळसे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांना मिळाला पाहिजे अशी कुटुंबाची भूमिका आहे. यासाठी जे करावे लागेल ते पक्ष म्हणून स्थानिक, राज्य पातळीवरील करण्यास आम्ही तयार आहोत. दोन्ही कुटुंबीयांतील एकाला आमच्या संस्थेत नौकरी देऊ. २८ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेचा आढावा घेतला असून त्यादिवशी या जखमींवर ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचार झाले असते तर ते वाचले असते. त्यांना १०८ अम्ब्युलन्समध्ये नगरला घेऊन जावे लागते. त्यांना सुरवातीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे गरजेचे असताना खाजगी हॉस्पिटल मध्ये नेले तसेच अहमदनगर सारख्या शहरात शवविच्छेदन करण्याची सोय नाही का? मृतदेह पर जिल्ह्यात घेऊन जावे लागतात हे संशयास्पद आहे.
गृहराज्यमंत्री दिपक केसरकर जिल्ह्यात येऊन पोलीस अधीक्षकांकडून आढावा घेतात व जामखेडची घडलेली घटना पाणी मारण्याच्या कारणांवरून झालेली आहे. ती राजकीय नाही असे बेजबाबदार विधान करतात. जामखेडची कायदा व सुव्यवस्था परिस्थिती काय आहे हे पत्रकार वारंवार लिहीतात, ही कात्रणे माझ्याकडे आहेत. शहर व तालुक्यात अवैध धंदे वाढले आहेत. सावकारकी मोठ्या प्रमाणावर होत असून काही वेगळ्या घटना घडत आहेत. वाळू तस्करी होत आहे. या सर्वांना राजाश्रय कोणाचा आहे? खरे जबाबदार केंव्हा पुढे येतील. तालुका व जिल्ह्यातील महसूल यंत्रणा शिथील झाल्याचा आरोप वळसे यांनी केला.
राळेभात बंधुच्या घटनेचे मूळ तालीम आहे. तेथे गुन्हेगार तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते अशी माहिती पोलीस अधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून मिळाली आहे. पोलिसांनी तालुक्यातील वाकी येथील घटना गांभीयार्ने घेतली असती तर कदाचित ही घटना घडली नसती, असे सांगून वळसे म्हणाले, जामखेड शहर व तालुका शांत व सहनशील आहे. शहराला बारा, बारा दिवस पाणी मिळाले नाही तरी लोकांचा उद्रेक होत नव्हता. शहर व तालुक्यात बाहेरील राज्यातील टोळ्या आल्या आहेत. गावठी कट्टा घेऊन ते सक्रिय आहेत. तालुक्यातील या टोळ्यांचा नायनाट होणे गरजेचे असून त्यादृष्टीने पोलीस यंत्रणेने काम केले पाहिजे. नगर येथील हत्याकांडात केडगाव येथे ६०० लोकांवर गुन्हा दाखल होऊन कोणालाच अटक केली जात नाही. तर दुस-या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली जाते. पोलीस दबावाखाली काम करीत आहेत. पोलीस प्रशासनाकडून थातूरमातूर उत्तरे दिली जातात. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात एकापेक्षा जास्त घटना घडत असतील व ते न्याय देऊ शकत नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातील राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी वळसे यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, किसनराव लोटके, राष्ट्रवादीच्या महीला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड, महीला प्रदेश उपाध्यक्ष शारदा लगड, बाजार समितीच्या उपसभापती शारदा भोरे, प्रदेश संघटक राजेंद्र कोठारी, युवक प्रदेश सरचिटणीस डॉ. भास्करराव मोरे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, हनुमंत पाटील, शरद भोरे, नगरसेवक अमित जाधव, शरद शिंदे, आदी उपस्थित होते.

Web Title: Demand of double murder of NCP workers in Jamshed district should be given to ATS - Dilip Walse's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.