दौंड भिमा रेल्वेस्थानकावर प्रवासी सुविधा देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:46 AM2020-12-11T04:46:58+5:302020-12-11T04:46:58+5:30
दौंड स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी दौंड-पुणे रेल्वेमार्गाला जोडणारी बायपास रेल्वेलाईन टाकण्यात आली. तेथे दौंड भिमा स्थानक नव्याने सुरू ...
दौंड स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी दौंड-पुणे रेल्वेमार्गाला जोडणारी बायपास रेल्वेलाईन टाकण्यात आली. तेथे दौंड भिमा स्थानक नव्याने सुरू करण्यात आले आहे. येथून पुणे व मनमाडकडे जाणाऱ्या गाड्या धावणार आहेत. मात्र, प्रवाशांना या स्थानकावर सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. बोगी क्रमांक दर्शविणारे फलक, पिण्याचे स्वच्छ पाणी, प्रतीक्षालय या सुविधांचा अद्याप अभाव आहे. रात्रीच्यावेळी प्रवाशांना त्यामुळे असुरक्षितता वाटते. लूटमार व गुन्हेगारी होऊ नये म्हणून येथे तातडीने पोलीस चौकी उभारण्याची गरज आहे, अशी मागणी श्रीगोड यांनी केली आहे.
दरम्यान, दौंड पुणे बायपास रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. त्यामुळे बायपास मार्गाचा उद्देश यशस्वी होईल. अन्यथा काष्टी व पाटस या रेल्वेस्थानकांवर गाड्या थांबून विलंब होईल. प्रवासी सेवेमुळे प्रवाशांची ४० मिनिटे बचत होणार आहे. तर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण झाल्यास १ तास ४० मिनिटे कमी होईल, असे रणजित श्रीगोड यांनी सांगितले.