‘पुणे-शिर्डी’ शिवशाही बससेवा सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 06:17 PM2019-02-01T18:17:28+5:302019-02-01T18:18:59+5:30

राज्य परिवहन महामंडळाने ‘पुणे-शिर्डी’ शिवशाही बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाश्यांकडून होत आहे. साईबाबांच्या समाधी मंदिरामुळे शिर्डी हे आंतरराष्टÑीय तीर्थस्थळ बनले आहे.

 The demand for the 'Pune-Shirdi' Shivshahi bus service | ‘पुणे-शिर्डी’ शिवशाही बससेवा सुरू करण्याची मागणी

‘पुणे-शिर्डी’ शिवशाही बससेवा सुरू करण्याची मागणी

शिर्डी : राज्य परिवहन महामंडळाने ‘पुणे-शिर्डी’ शिवशाही बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाश्यांकडून होत आहे.
साईबाबांच्या समाधी मंदिरामुळे शिर्डी हे आंतरराष्टÑीय तीर्थस्थळ बनले आहे. साई दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांचा ओघ प्रचंड आहे. शहरात साई मंदिरानजीक अहमदनगर-मनमाड राज्यमार्गावर महामंडळाचे बसस्थानक आहे. एस.टी. बसेसच्या माध्यमातुन महाराष्टÑासह परराज्यातील हजारो साईभक्त दररोज ये-जा करतात. शिर्डीत मुंबई, नाशिक, औरंगाबाद, धुळे आदी शहरांमधून आरामदायी व वातानूकुलीत शिवशाही बसेस येतात. मात्र मुंबईनंतर दुसºया क्रमांकाच्या पुणे शहरातुन शिर्डीसाठी एकही शिवशाही बस सुरू नाही. पुण्याहून येणाºया साईभक्तांची संख्या मोठी असल्याने महामंडळास आर्थिक फायदा व साईभक्तांची सोय
होईल. म्हणून ‘पुणे-शिर्डी’ शिवशाही बस सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाश्यांकडून होत आहे.
 

 

Web Title:  The demand for the 'Pune-Shirdi' Shivshahi bus service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.