विसापूर तलावातून पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:24 AM2021-01-16T04:24:06+5:302021-01-16T04:24:06+5:30
श्रीगोंदा : विसापूर तलावात तीन आवर्तनाएवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. लाभक्षेतातील गावांची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे विसापूर तलावातून तातडीने ...
श्रीगोंदा : विसापूर तलावात तीन आवर्तनाएवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. लाभक्षेतातील गावांची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे विसापूर तलावातून तातडीने शेतीसाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी बाजार समितीचे माजी बाळासाहेब नाहाटा यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांना निवेदन दिले आहे.
विसापूर तलावात दरवर्षी कुकडीचे पाणी सोडावे लागते. त्यानंतर विसापूरचे आवर्तन सोडले जाते. गेल्या वर्षी विसापूर तलाव पावसाने ओव्हरफ्लो झाला होता. त्यामुळे यंदा कुकडी पाणी विसापूर तलावात सोडण्याची आवश्यकता नाही. विसापूर लाभक्षेत्रातील बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, घारगाव, पिंपळगाव, खरातवाडी, शिरसगाव बोडखा, पिसोरे, चिंभळे येथील पिके पाण्याअभावी सुकून चालली आहेत. तरी विसापूरचे आवर्तन सोडणे आवश्यक आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.