भिंगारमधील अतिक्रमण हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:37 AM2021-03-04T04:37:27+5:302021-03-04T04:37:27+5:30

भिंगार : भिंगार येथील विशाखापट्टणम महामार्गावर विजय लाइन चौकातील दुकानासमोरील अतिक्रमण न हटविता, अ‍ॅट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देऊन ...

Demand for removal of encroachment in Bhingar | भिंगारमधील अतिक्रमण हटविण्याची मागणी

भिंगारमधील अतिक्रमण हटविण्याची मागणी

भिंगार : भिंगार येथील विशाखापट्टणम महामार्गावर विजय लाइन चौकातील दुकानासमोरील अतिक्रमण न हटविता, अ‍ॅट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देऊन पैशांसाठी मानसिक त्रास देणा‌‌ऱ्या महिलेवर कारवाई करावी, सदरचे अतिक्रमण हटवावे, या मागणीचे निवेदन स्थानिक व्यापारी सुमितकुमार संतोष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी मंगळवारी कार्यालयात दिले.

महिलेविरोधात कारवाई न झाल्यास, दि.१५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा प्रसाद यांनी दिला आहे. सुमितकुमार संतोष प्रसाद यांचे भिंगार येथे विजय लाइन चौकात स्वत:च्या मालकीचे दुकान आहे. तेथे शीतपेय व खाद्यपदार्थ जिल्ह्यात पुरविण्याचे काम केले जाते. या दुकानासमोर एका महिलेने अतिक्रमण केले आहे. सदर अतिक्रमण काढण्यासाठी सुमित कुमार यांनी तक्रार करून २७ ऑगस्ट, २०२० रोजी प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण हटविले होते, परंतु सदर महिलेने पुन्हा दुकानासमोर ४ डिसेंबर रोजी अतिक्रमण केले. त्यानंतर, या महिलेने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली आहे. सदर महिला अ‍ॅट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देत आहे. काही राजकीय पक्ष व संघटना सोबत घेऊन वारंवार पैशाची मागणी करत असल्याचा आरोप सुमित कुमार यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

मी कुटुंबातील कर्ता पुरुष असून, संपूर्ण कुटुंब एकट्यावर अवलंबून आहे. सदर महिलेपासून मला धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी महिलेविरोधात भिंगार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून घेण्यात आलेला नाही. पोलीस प्रशासन सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दुकानासमोरील महिलेचे अनधिकृत अतिक्रमण तातडीने हटवावे, अन्यथा १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही सुमित कुमार यांनी दिला आहे.

Web Title: Demand for removal of encroachment in Bhingar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.