घरकूल वंचितांसाठी प्रकल्प उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:24 AM2021-02-09T04:24:24+5:302021-02-09T04:24:24+5:30
--------------- ज्ञानवर्धिनी परीक्षेत श्रीराम विद्यालयाचे यश अहमदनगर : जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत ...
---------------
ज्ञानवर्धिनी परीक्षेत श्रीराम विद्यालयाचे यश
अहमदनगर : जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत नगर तालुक्यातील राळेगण येथील श्रीराम विद्यालयातील सात विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे व विश्वस्त मुकेश मुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेमार्फत दरवर्षी ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. संस्था शाखा व इतर संस्थेतील इयत्ता ६वी व ७वीचे ८ हजार ४४४ विद्यार्थी या जिल्हास्तर स्पर्धा परीक्षेत सहभागी झाले होते. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब साबळे, विजय जाधव, बाळासाहेब पिंपळे, राजेंद्र कोतकर, राजश्री जाधव, संजय भापकर, सुजय झेंडे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत विद्यालयातील गौरी गोडसे, संस्कृती हराळ यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे.