मुंबईच्या धर्तीवर नगरमध्ये ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:20 AM2021-05-12T04:20:41+5:302021-05-12T04:20:41+5:30

निवेदनात म्हटले आहे की, सध्या तापमान खूप वाढले आहे. अशा तापमानात ४५ वयाच्या नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगांना रांगेत ताटकळत ...

Demand to start drive-in vaccination in the city on the lines of Mumbai | मुंबईच्या धर्तीवर नगरमध्ये ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सुरू करण्याची मागणी

मुंबईच्या धर्तीवर नगरमध्ये ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सुरू करण्याची मागणी

निवेदनात म्हटले आहे की, सध्या तापमान खूप वाढले आहे. अशा तापमानात ४५ वयाच्या नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगांना रांगेत ताटकळत उभे न राहता सुलभ रीतीने लस घेता येईल. यामुळे वाढत्या उन्हामुळे काही अनुचित प्रकार होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. काही लसीकरण केंद्रांवर खूप सारी अनावश्यक गर्दी होते. त्या गर्दीमुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सुरू केल्यास उन्हाच्या तडाख्यात लागणाऱ्या रांगा आणि होणारी गर्दी या कटकटीतून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या कुटुंबीयांची हेळसांड कमी होईल. तसेच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात न आल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊन कोरोनाचा फैलाव थांबण्यास मदतच होईल.

Web Title: Demand to start drive-in vaccination in the city on the lines of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.