ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:38+5:302021-07-07T04:25:38+5:30
अहमदनगर : ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणारे २७ टक्के राजकीय आरक्षण त्वरित पूर्ववत देण्याच्या मागणीचे निवेदन शिवा अखिल ...
अहमदनगर : ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणारे २७ टक्के राजकीय आरक्षण त्वरित पूर्ववत देण्याच्या मागणीचे निवेदन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेने सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले.
संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या सूचनेनुसार ओबीसी समाजाचे नेते तथा शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन शेटे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी अनिल भाताबरे, दत्तात्रेय भाताबरे, चंद्रकांत काटकर, सोमनाथ जंगम, अक्षय कोरे, शुभम पखाले, सुनील शेटे, विशाल जंगम, शिवकुमार डोंगरे, संतोष सबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकारमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी ओबीसीसह एससी व एसटी यांचे हक्काचे एकूण ५२ टक्के आरक्षण लागू करून कर्मचाऱ्यांची पदोन्नती करावी. सन २०१९ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातीनिहाय वेगळी जनगणना करण्यात यावी. राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दुसऱ्यांदा पुनर्विलोकन याचिका दाखल करून इंपरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात यावा. राज्यातील ओबीसींसाठी लागू असलेली नॉन क्रिमिलियरची जाचक अट त्वरित रद्द करण्यात यावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
--
फोटो - ०५वीरशैव
अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेने सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
------