मुळा धरणातून पाण्याची मागणी थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:26 AM2021-08-25T04:26:02+5:302021-08-25T04:26:02+5:30

मुळा धरणाची पाणी साठवण क्षमता २६ हजार दशलक्ष घनफूट आहे. पाऊस थांबला असला तरी धरणाकडे कोतूळ येथून ८७६ क्युसेकने ...

Demand for water from Mula Dam cooled down | मुळा धरणातून पाण्याची मागणी थंडावली

मुळा धरणातून पाण्याची मागणी थंडावली

मुळा धरणाची पाणी साठवण क्षमता २६ हजार दशलक्ष घनफूट आहे. पाऊस थांबला असला तरी धरणाकडे कोतूळ येथून ८७६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणामध्ये १८,८०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी १४ हजार ३०० दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच काळामध्ये धरणांमध्ये २२ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचा साठा कमी आहे. गेल्या वर्षीचा २ हजार दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणीसाठा असतानाही मुळा धरणात यंदा पाण्याची पातळी कमी झाल्याचे दिसून येते. पंधरा दिवसापूर्वी मुळा धरणातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडावे अशी शेतकरी वर्गातून मागणी करण्यात आली होती.

...................

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणामध्ये पाणीसाठा कमी आहे. साेमवारपासून पाऊस थांबला असून दिवसभर लख्ख सूर्यप्रकाश पडला आहे. धरणाकडील पाण्याची आवक घटली असून तरी देखील यंदा मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

-अण्णासाहेब आंधळे, शाखा अभियंता

.............

Web Title: Demand for water from Mula Dam cooled down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.