सांडव्यात दरोडेखोरांचा धुमाकुळ : अप्पर जिल्हा अधिक्षकांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 04:45 PM2018-08-17T16:45:05+5:302018-08-17T16:45:36+5:30

नगर तालुक्यातील सांडवे येथील सदाशिव खंडू खांदवे यांच्या उक्कडगांव रस्त्यावरील वस्तीवर दरोडेखोरांनी प्रंचड मारहाण करत धुमाकुळ घालत घरातील दागिने व रोख रक्कम पळविली.

Demolition of rioters in the Sandwiches: Appeal to the Additional District Superintendents | सांडव्यात दरोडेखोरांचा धुमाकुळ : अप्पर जिल्हा अधिक्षकांना निवेदन

सांडव्यात दरोडेखोरांचा धुमाकुळ : अप्पर जिल्हा अधिक्षकांना निवेदन

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील सांडवे येथील सदाशिव खंडू खांदवे यांच्या उक्कडगांव रस्त्यावरील वस्तीवर दरोडेखोरांनी प्रंचड मारहाण करत धुमाकुळ घालत घरातील दागिने व रोख रक्कम पळविली. सांडवे गावात आठवड्यात ही दुसरी घटना घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या घटनांनी संतप्तग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, दूरसंचार निगमच्या महाप्रबंधकांना निवेदन दिले.
मागील आठवड्यात दरोडेखोरांनी सदाशिव खांदवे यांचा मुलगा दत्तात्रय सदाशिव खांदवे यांना ही मारहाण केली. शेजारी राहणारे प्रवीण अशोक दळवी यांच्या घरी जाऊन त्यांचा भाऊ महेश दळवी व लहान मुलांना मारहाण केली. सोनाली प्रवीण दळवी यांच्या अंगावरील गळ्यातील व कानातील दागिने ओरबडुन घेतले. गेल्या आठवड्यात बापू नामदेव खांदवे यांच्या वस्तीवर दरोडेखोरांनी दोन तीन तास थांबुन मारहाण करत दागिने व रोकड पळविली होती. कालही गावात पुन्हा चोरीची घटना घडली. निवेदन देतेवेळी नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, अजय बोरूडे यांच्या सह गावातील महिलांनी निवेदन सादर केले.
गावात नाही मोबाईलला रेंज
मोबाइलला रेंज नसल्याने मदत मिळवण्यात अपयश आल्याने गावक-्यांच्या रोष भारत संचार निगमवर आहे. वारंवार मागणी करून ही सांडवे गावत टॉवर होत नसल्याने चोरीचे प्रमाण वाढल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
 

 

Web Title: Demolition of rioters in the Sandwiches: Appeal to the Additional District Superintendents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.