गुरव समाजाचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:41 PM2017-10-11T16:41:20+5:302017-10-11T16:42:16+5:30
अहमदनगर : गुरव समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली. नगर जिल्हा गुरुव समाज ...
अहमदनगर : गुरव समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली.
नगर जिल्हा गुरुव समाज सेवाभावी संस्थेच्यावतीने त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपजिल्हाधिकारी वामन कदम यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष अनिल तोरडमल, उपाध्यक्ष योगेश वाघ, सचिव महेश शिर्के, सुरेश थोरात, शिवाजी शेलार, प्रशांत शेलार, सचिन रेणुकर, गणेश शिंदे, अरविंद आचार्य, बाळासाहेब गुरव, शिवनाथ शिंदे, सुरेखा तोरडमल, स्मीता शेलार, सुवर्णा जावळे, विनायक धुमाळ, पंकज काळे, रामकृष्ण क्षीरसागर, कैलास मल्लनाथ, सुनिल पवार, आदिनाथ शिंदे, सागर शिंदे, बाळासाहेब चौधरी, सचिन घोडके, बाळासाहेब घोडके, संजय घोडके, रमेश क्षीरसागर, बाबासाहेब जाधव, सदाशिव जाधव, नितीन जाधव, गंगाधर पतने, रामनाथ जाधव, दत्तात्रय मल्लनाथ, केदारी, नाना पांडे, निलिमा धुमाळ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, देवस्थान इनाम वर्ग - ३ चे तवन खालसा करणे, जमीनीचा फेर सर्व्हे करणे, बेकायदेशीर हस्तांतरण झालेल्या जमिनी मूळ सनद धारकांच्या ताब्यात देणे, इतर हक्कातील नाव काढून गुरवांची नावे कबजेदार सदरी लावणे, देवस्थान जमिनीला लावलेले बेकायदेशीर कूळ काढून टाकणे, त्या जमिनी मूळ सनद धारकांच्या ताब्यात देणे, सार्वजनिक कामांसाठी घेतलेल्या जमिनी चालू बाजार भावांप्रमाणे योग्य तो मोबदला शासनाने द्यावा. सर्व ट्रस्टमध्ये गुरवांना ५० टक्के विश्वस्त व पदाधिकारी म्हणून घ्यावे, पुजेचा, धार्मिक विधीचा व उत्पन्नाचा वंश परंपरागत हक्क कायम ठेवणे, शैक्षणिक शिष्यवृत्त देणे, वसतीगृहासाठी जागा उपलब्ध करुन देणे, निवृत्ती वेतन, शेती विषयक कर्ज पुरवठा, ओबीसींचे दाखल, समाजास अल्पसंख्यांकाचा दर्जा देणे आदी मागण्या निवेदनातद्वारे केल्या आहेत.