पढेगावात डेंग्यूसदृश रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 06:21 PM2019-09-04T18:21:29+5:302019-09-04T18:22:33+5:30
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पढेगाव येथे डेंग्यूचा रूग्ण आढळल्याने गावात घबराट निर्माण झाली. पढेगाव येथील कामिनी दाणे यांची डेंग्यू आजाराची चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांच्यावर कोपरगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दहिगाव बोलका(जि.अहमदनगर) : कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पढेगाव येथे डेंग्यूचा रूग्ण आढळल्याने गावात घबराट निर्माण झाली. पढेगाव येथील कामिनी दाणे यांची डेंग्यू आजाराची चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांच्यावर कोपरगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पढेगाव हे गाव दहिगाव बोलका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येते. सध्या ग्रामसेवक संपावर असल्याने गावातील स्वच्छतेसाठी गावात तणनाशक व धूर फवारणी आवश्यक असताना ते होत नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.
कामिनी दाणे यांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने गावात जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. वैशाली बडदे यांनी सांगितले.