तेल्या रोगावरील नियंत्रणासाठी कृषी विभाग सरसावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:33+5:302021-05-31T04:16:33+5:30
केडगाव : डाळिंब पिकावर (तेल्या रोग) जीवाणूजन्य करपामुळे शेतकऱ्यांनी डगमगून जाऊ नये. हा करपा उपाययोजना केल्यानंतर नियंत्रणात येतो. यासाठी ...
केडगाव : डाळिंब पिकावर (तेल्या रोग) जीवाणूजन्य करपामुळे शेतकऱ्यांनी डगमगून जाऊ नये. हा करपा उपाययोजना केल्यानंतर नियंत्रणात येतो. यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच जैविक बुरशीनाशके वापरण्याबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी सांगितले.
नगर तालुक्यातील अरणगाव (शिंदेवाडी), खंडाळा व बाबुर्डी येथील डाळिंब बागांची नवले यांनी पाहणी करून तेल्या रोगाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंडल कृषी अधिकारी जगदीश तुंभारे, कृषी पर्यवेक्षक जालिंदर गांगुर्डे, कृषी सहाय्यक उमेश शेळके यांच्यासह डाळिंब उत्पादक शेतकरी किसनराव लोटके, गणेश शिंदे, बन्सी शिंदे, शरद टकले, विक्रम वाळके आदींनी डाळिंब पिकावरील तेल्या रोगाच्या नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करून उपाययोजना सुचविल्या.
नवले म्हणाले, तालुक्यात ९५० हेक्टरवर, तर अरणगाव, खंडाळा व बाबुर्डी येथे २०० एकरमध्ये डाळिंबाची लागवड केली आहे. जैविक बुरशीनाशकांचा वापर केल्यास कमी खर्चात तेल्या रोग नियंत्रणात येईल. मागील १४ वर्षांपासून येथील शेतकरी डाळिंबाचे पीक घेत असून ते अनुभवी आहेत. दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन त्यांनी घेतले आहे. हवामानातील बदल, ढगाळ वातावरण, हवेतील आर्द्रता यामुळे नवीन १ ते दीड वर्षे लागवड झालेल्या पिकावर या रोगाचा फांदी व खोडावर प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे कृषी विभागाने उपाययोजना सुचविल्या आहेत, असे ते म्हणाले.
290521\3103img-20210528-wa0246.jpg
कृषी विभागाकडुन पाहणी