कुख्यात वाळूतस्करांची टोळी हद्दपार : पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 04:09 PM2018-05-02T16:09:44+5:302018-05-02T16:10:02+5:30

संघटितपणे अवैध वाळूउपसा, अपहरण, मारहाण, जबरी चोरी, दरोडा, सरकारी नोकरास मारहाण आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या राहुरी येथील वाळूतस्कर सुभाष माळी याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.

Deportation of infamous sand mints: Police action | कुख्यात वाळूतस्करांची टोळी हद्दपार : पोलिसांची कारवाई

कुख्यात वाळूतस्करांची टोळी हद्दपार : पोलिसांची कारवाई

अहमदनगर : संघटितपणे अवैध वाळूउपसा, अपहरण, मारहाण, जबरी चोरी, दरोडा, सरकारी नोकरास मारहाण आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या राहुरी येथील वाळूतस्कर सुभाष माळी याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
सुभाष साहेबराव माळी (वय ३२), गौतम साहेबराव माळी (वय ३०) व किशोर साहेबराव माळी (वय २७ रा़ सर्व आतारमळा, बारागाव नांदूर ता़ राहुरी) असे हद्दपार केलेल्या तिघांची नावे आहेत. सुभाष माळी व त्याच्या दोन साथीदारांवर गेल्या काही वर्षांत गंगीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारी टोळ्यांमुळे जिल्ह्यात कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारी कारवार्इंमध्ये सक्रिय असलेल्या जिल्ह्यातील आणखी २० टोळ्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येणार आहे़ पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Web Title: Deportation of infamous sand mints: Police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.