पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके उतरले रस्त्यावर : बेशिस्त वाहतूकीवर कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 03:40 PM2018-12-20T15:40:26+5:302018-12-20T15:40:35+5:30
अहमदनगर : शहरातील बेकायदा रिक्षा वाहतुकीवर पोलीसांनी कारवाई सुरु केली आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी पाहणी करून दुपारी ...
अहमदनगर : शहरातील बेकायदा रिक्षा वाहतुकीवर पोलीसांनी कारवाई सुरु केली आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी पाहणी करून दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी कारवाई केली. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी कारवाई सुरु केली आहे. सुमारे ६० ते ७० रिक्षांवर कारवाई करण्यात आली.
शहरात बेशिस्त रिक्षा चालकांनी नागरिकांच्या जीवाशी खेळ चालू केला होता. कोठेही रिक्षा थांबवणे, कशीही रिक्षा चालवणे. बस स्टँड आणि दिल्ली गेट परिसरात तर रस्ताच दिसत नव्हता. नागरिकांना पायी चालणेही मुश्किल होते. अशी परिस्थिती शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पाहणीत दिसून आली. साध्या गणवेशात दुचाकीवरून मिटके यांनी पाहणी केली.