नगरमध्ये महादेवाच्या पिंडीची विटंबना; पोलिस अधिकाऱ्यांनी केली पाहणी

By अण्णा नवथर | Published: October 23, 2023 02:44 PM2023-10-23T14:44:38+5:302023-10-23T14:45:26+5:30

माळीवाडा परिसरात पुरातन  महादेवाचे मंदिर आहे.

Desecration of Mahadeva's Pindi in the city; Police officers inspected | नगरमध्ये महादेवाच्या पिंडीची विटंबना; पोलिस अधिकाऱ्यांनी केली पाहणी

नगरमध्ये महादेवाच्या पिंडीची विटंबना; पोलिस अधिकाऱ्यांनी केली पाहणी

अहमदनगर: शहरातील माळीवाडा येथील महादेव मंदिरातील महादेवाच्या पिंडीची विटंबना झाल्याचा प्रकार घडला. दरम्यान हिंदुत्व lवादी संघटनांनी मंदिरात धाव घेत कारवाई करण्याची मागणी केली. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

माळीवाडा परिसरात पुरातन  महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरातील महादेवाच्या पिंडीची विटंबना झाली असल्याचे सोमवारी सकाळी पूजा करताना निदर्शनास आले. ही माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटना, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मदिरात घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उप अधीक्षक अनिल कतकडे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दुपारी मंदिराची पाहणी केली असून, मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आमदार संग्राम जगताप हे कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाले असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Desecration of Mahadeva's Pindi in the city; Police officers inspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.