आंदोलने करूनही वाळू उपसा होईना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:11+5:302021-06-17T04:15:11+5:30

कासारा दुमाला (आडवी नदी) ते संगमनेर खुर्द येथील मोठ्या पुलापर्यंत रात्रंदिवस अवैधरीत्या वाळू उपसली जात आहे. त्यामुळे नदी परिसरातील ...

Despite the agitation, the sand was not removed | आंदोलने करूनही वाळू उपसा होईना बंद

आंदोलने करूनही वाळू उपसा होईना बंद

कासारा दुमाला (आडवी नदी) ते संगमनेर खुर्द येथील मोठ्या पुलापर्यंत रात्रंदिवस अवैधरीत्या वाळू उपसली जात आहे. त्यामुळे नदी परिसरातील पुरातन घाट, मंदिरांना धोका निर्माण झाला आहे. येथून वाळू उपसा बंद व्हावा, अशी आमची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. शहरातील प्रवरा नदीचा परिसर निर्सगरम्य आहे. येथे नगर परिषदेच्या वतीने सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, या परिसराची अवैधरीत्या सुरू असलेल्या वाळू उपशाने मोठी हानी झाली आहे. नदीपात्रात मोठे खड्डे पडले असून, पोहायला अथवा गणेश विसर्जनासाठी आलेल्या अनेकांचा खड्ड्यांमध्ये बुडून मृत्यू झाला.

पुरातन व नवीन घाट देखील खचले आहेत. पात्रातील विहिरी व पाईपलाईन उघड्या पडल्या आहेत. विहिरींची पाण्याची पातळी खालावली आहे. पर्यावरणाच्या होत असलेल्या ऱ्हासाकडे प्रशासकीय अधिकारी ‘अर्थपूर्ण’ संबंधातून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वाळू उपसा न थांबल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

-------------

वाळू तस्कर होणार तडीपार

अवैधरीत्या वाळू उपसा व वाहतूक रोखण्याकरिता भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस व महसूल प्रशासन यांच्या संयुक्त पथकाद्वारे कारवाई करीत गुन्हे दाखल करण्यात येतील. यापूर्वी अनेक गुन्हे दाखल करीत कारवाई करण्यात आली. तालुका मोठा असल्याने कारवाई करताना काही अडचणी येतात. वाळू चोरीचे दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल असलेल्यांना तडीपार करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव बनविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय अधिकारी, संगमनेर विभाग

............

फोटो नेम : १६ संगमनेर

ओळ : अवैधरीत्या सुरू असलेला वाळू उपसा रोखण्यासाठी शहरातील गंगामाई घाट परिसरातील नदीपात्रात ‘झोपा काढा’ आंदोलन करण्यात आले.

Web Title: Despite the agitation, the sand was not removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.