सत्ता असूनही आमचे चालत नाही

By Admin | Published: April 25, 2016 11:17 PM2016-04-25T23:17:27+5:302016-04-25T23:19:24+5:30

संगमनेर : भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेंद्र भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या टंचाई आढावा बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्याने एकच गोंधळ उडाला.

Despite our power, we do not walk | सत्ता असूनही आमचे चालत नाही

सत्ता असूनही आमचे चालत नाही

संगमनेर : भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेंद्र भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या टंचाई आढावा बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्याने एकच गोंधळ उडाला.
युती सरकारतर्फे सोमवारी आ. भोळे यांची एकस्तरीय समिती तालुक्यातील दुष्काळाच्या पाहणीसाठी आली होती. भोळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहावर टंचाई आढावा बैठक झाली. तहसीलदार शरद घोरपडे, पं. स. चे सहायक गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, भाजपा तालुकाध्यक्ष काशीनाथ पावसे, उपाध्यक्ष दत्तात्रय खुळे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे आदी उपस्थित होते. बैठकीत पाणी टंचाई ऐवजी अधिकाऱ्यांकडून युतीच्या कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या दुजाभावाच्या वागणुकीवरच अधिक ऊहापोह झाला. तालुक्यातील अधिकारी काँग्रेस आमदाराच्या दबावाखाली कामे करतात. आपली सत्ता येऊनही आम्हाला विरोधक असल्यासारखे वाटते. परवानगी नसताना प्रवरा नदीतून वाळू उपसा सुरू आहे. ५२ कोटींची वाळू चोरी झाली अन् महसूलचे अधिकारी १३ कोटीची वसुली केल्याचे सांगतात, अशा गंभीर तक्रारी शहराध्यक्ष सांगळे यांनी केल्या.
तळेगाव पाणी पुरवठा योजनेची कमिटी काँग्रेसची असल्याने अवास्तव निर्णय घेतले जातात. शुद्धीकरण केंद्र बंद असल्याने दूषित पाणी प्यावे लागते. या कमिटीची चौकशी करा, अशी मागणी शरद गोर्डे यांनी केली. पेमगिरीला कायमस्वरुपी तलाठी नाही, आम आदमी विमा योजनेचा लाभ नागरिकांना मिळत नाही, असे दिलीप कोल्हे यांनी म्हटले. बैठकीत नियोजनाचा अभाव असल्याने गोंधळ उडाला. याप्रसंगी जि. प. पाणी पुरवठ्याचे उपअभियंता ए. एच. तडवी, महावितरणचे हेमंतकुमार चौरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, दादा गुंजाळ, रंगनाथ फटांगरे, शाम कासार आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Despite our power, we do not walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.