विजेच्या शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:38 AM2021-03-04T04:38:36+5:302021-03-04T04:38:36+5:30
कोरडगाव : येथील भानुदास केदार व विष्णू केदार यांच्या शेतामधील विजेच्या तारा एकमेकांना घासल्यामुळे विजेचे लोळ पडून दोन ...
कोरडगाव : येथील भानुदास केदार व विष्णू केदार यांच्या शेतामधील विजेच्या तारा एकमेकांना घासल्यामुळे विजेचे लोळ पडून दोन एकरमधील ऊस पीक खाक झाले. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. यात ऊसाचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.
कोरडगाव (ता. पाथर्डी) येथील सेवानिवृत्त मेजर भानुदास केदार तसेच त्यांचा भाऊ विष्णू केदार यांच्या राहत्या घराजवळ वीज वितरण कंपनीची मुख्य लाईन गेली आहे. या ठिकाणाहून परिसरातील अनेक डीपींना वीजपुरवठा पाठविण्याची सुविधा आहे.
अनेक दिवसांपासून या ठिकाणी तारा एकत्र येत होत्या. त्याबाबत ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीला सूचना दिल्या होत्या. परंतु कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. बुधवारी दुपारी त्या तारा एकमेकांना चिकटून विजेचे लोळ या ठिकाणच्या ऊसामध्ये पडल्याने ऊसाने पेट घेतला होता. यात सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले आहे. कुठलीही जीवितहानी झाली नाही. वीज वितरण कंपनीच्या असिस्टंट इंजिनिअर प्रिया मुंढे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.