‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षणास देवदैठणला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:26 AM2021-04-30T04:26:16+5:302021-04-30T04:26:16+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षणा अंतर्गत घरोघरी जाऊन तपासणीला सुरुवात झाली आहे. ...
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षणा अंतर्गत घरोघरी जाऊन तपासणीला सुरुवात झाली आहे. देवदैठण गावात कोरोनाचे रुग्ण आढळले असून, अनेक व्यक्तींचे कोरोनामुळे निधनही झाले आहे. या पार्श्वभूमीवर २८ एप्रिल ते २ मे या कालावधीत संपूर्ण गावाचे सर्वेक्षण केले जात आहे.
सरपंच जयश्री गुंजाळ, उपसरपंच पूजा बनकर, ग्रामसेवक सुरेश इगावे, सदस्य नीलेश गायकवाड यांनी सभा घेऊन कोरोना परिस्थितीबद्दल आढावा घेतला तसेच सर्वेक्षणाबाबत नियोजन केले. या वेळी केंद्रप्रमुख बबन वेताळ, मुख्याध्यापक आर. टी. शिंदे, मुख्याध्यापक मंदा वाघमारे, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक उपस्थित होते.
आशा सेविका, अंगणवाडी सेविका व शिक्षक यांचे गट करून सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन पातळी तपासत असतानाच कोणास कोरोना लक्षणे आहेत का, याचीही चाचपणी करीत आहेत.