खडसेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनी घेतले शनिदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:19 IST2020-01-12T13:18:06+5:302020-01-12T13:19:29+5:30
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री दहा वाजता शिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले. दरम्यान दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिदर्शन घेतले होते.

खडसेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनी घेतले शनिदर्शन
सोनई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री दहा वाजता शिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले. दरम्यान दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिदर्शन घेतले होते.
औरंगाबाद येथून कार्यक्रम आटोपून पुण्याकडे जात असताना फडणवीस यांनी रात्री दहाच्या सुमारास शिंगणापूर येथे गेले. तेथे त्यांनी शनिदर्शन घेतले. येथील उदासी महाराज मठात पूजा करून अभिषेक घातला. तद्नंतर त्यांनी चौथºयावर जाऊन शनिदर्शन घेतले. यावेळी फडणवीस यांचा देवस्थानच्या वतीने योगेश बानकर यांनी सत्कार केला. यावेळी बाळासाहेब कु-हाटे, सुभाष पवार आदी उपस्थित होते.
शनिदर्शनानंतर पत्रकारांनी फडणवीस यांना छेडले असता त्यांनी राजकीय भाष्य करण्याचे टाळले. मात्र शनिदर्शनाने आत्मिक समाधान मिळाल्याने त्यांनी सांगितले.