श्री दत्त जन्मोत्सवासाठी देवगड नगरी सज्ज
By Admin | Published: December 23, 2015 11:18 PM2015-12-23T23:18:35+5:302015-12-23T23:24:44+5:30
नेवासा : तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या भगवान दत्तात्रेयांच्या जन्म सोहळ्यासाठी देवगडनगरी सज्ज झाली आहे.
नेवासा : तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या भगवान दत्तात्रेयांच्या जन्म सोहळ्यासाठी देवगडनगरी सज्ज झाली आहे. दत्त जन्मोत्सवानिमित्त देवगड येथे सध्या ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचनासह इतर विविध धार्मिक सुरु आहेत.
श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य हभप भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी होणाऱ्या श्री दत्त जन्म सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा यांच्या दिव्य तपश्चर्येतून भगवान दत्तात्रेयांचे हे गुरुदेव दत्तपीठ प्रवरातिरी भक्तांच्या उद्धारासाठी निर्माण झाले आहे. या क्षेत्राला भगवान दत्तात्रेयांचा पदस्पर्श झाल्याने हे स्थान जागृत बनले आहे.
राज्यासह परराज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता पार्किंग व्यवस्था, निवास व्यवस्था असे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे. मंदिर प्रांगणात भरणाऱ्या यात्रेसाठी विविध दुकानदारांना जागा उपलब्धतेसह विजेची व्यवस्था करण्यात आली. दर्शनबारी रांगेसह इतर सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
२४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या श्रीदत्त जन्म सोहळ्यासाठी दोन स्क्रीन पडद्यांची व्यवस्था मंदिराबाहेर करण्यात आली आहे.
(तालुका प्रतिनिधी)