नेवासा तालुक्यातील देवगडचे मंदिर भाविकांसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:57 PM2020-03-17T12:57:42+5:302020-03-17T12:58:01+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र देवगडचे दत्त मंदिर, संस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय, उपहारगृहे, इतर दूकाने पुढील प्रशासकीय आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती मंगळवारी संस्थानच्या वतीने देण्यात आली.

Devgad temple in Nevasa taluka closed for devotees | नेवासा तालुक्यातील देवगडचे मंदिर भाविकांसाठी बंद

नेवासा तालुक्यातील देवगडचे मंदिर भाविकांसाठी बंद

नेवासा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र देवगडचे दत्त मंदिर,संस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय, उपहारगृहे, इतर दूकाने पुढील प्रशासकीय आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती मंगळवारी संस्थानच्या वतीने देण्यात आली.
किसनगिरीबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने १६ मार्च ते २१ मार्च या कालावधीमध्ये सप्ताहाचे अत्यंत अत्यल्प प्रमाणात नियोजन केलेले होते. तथापि सध्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे वाढते प्रमाण, तसेच महाराष्ट्रातील विषाणूबाधितांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीची ठिकाणे नियंत्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रकारच्या धार्मिक स्थळांना दर्शन बंद करण्याचे तसेच गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून मंदिर करण्याचा निर्णय घेतला आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून संस्थान प्रशासनाने नियोजित पुण्यतिथी कार्यक्रम पूर्णत: रद्द केलेला आहे.  संस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय, उपहारगृहे, इतर दुकाने तथा मंदिर प्रवेश पुढील प्रशासकीय आदेशापर्यंत बंद ठेवलेली आहेत. श्री क्षेत्र देवगड येथे दर्शनार्थ येणा-या सर्व भाविकांनी कृपया याची नोंद घेऊन श्री क्षेत्र देवगड येथील गर्दी नियंत्रणासाठी संस्थान व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Devgad temple in Nevasa taluka closed for devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.