साईमंदिरात भाविकांचे तापमान मोजण्यासाठी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:35 PM2020-03-12T12:35:53+5:302020-03-12T12:36:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिर्डी : जगभर असलेले कोरोनाचे भय झुगारून भाविक साईदर्शनासाठी गर्दी करत आहेत़ मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भाविकाच्या शरीराचे तापमान तपासणी करूनच त्याला दर्शनासाठी सोडणे आता शक्य होणार आहे़ यासाठी भाविकांच्या रांगेत नॉन कॉन्टेक्ट डिजिटल थर्मामिटरचा वापर करता येणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : जगभर असलेले कोरोनाचे भय झुगारून भाविक साईदर्शनासाठी गर्दी करत आहेत़ मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भाविकाच्या शरीराचे तापमान तपासणी करूनच त्याला दर्शनासाठी सोडणे आता शक्य होणार आहे़ यासाठी भाविकांच्या रांगेत नॉन कॉन्टेक्ट डिजिटल थर्मामिटरचा वापर करता येणार
आहे़
साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांनी या प्रकारचे ११ थर्मामिटर देणगी स्वरूपात बुधवारी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांना सुपुर्द केले़ यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे व उप मुख्यअभियंता रघुनाथ आहेर आदींची उपस्थिती होती़
बुधवारी दुपारी दर्शन रांगेत अर्धा तास या उपकरणांची चाचणीही घेण्यात आली़ भाविकाला स्पर्श न करता त्याच्या चेहºयाजवळ हे इन्फारेड उपकरण नेल्यास भाविकाच्या शरीराचे तपमान (ताप) समजणार आहे़ यामुळे प्राथमिक स्वरूपात संशयित रूग्ण ओळखण्यास सोपे होणार आहे़ मात्र ही तपासणी दर्शन रांगेत करण्याऐवजी जेथे बायोमेट्रिकचे किंवा जनसंपर्क कार्यालयात पास काढले जातात तेथेच व पूर्णवेळ करणे आवश्यक आहे़ याशिवाय संस्थानने आयसोलेशन वॉर्डही तयार ठेवला आहे़