विघ्नहर्त्याची भक्तिभावाने प्रतिष्ठापना

By Admin | Published: August 29, 2014 11:31 PM2014-08-29T23:31:48+5:302014-08-29T23:38:55+5:30

जिल्ह्यात शुक्रवारी ठिकठिकाणी विघ्नहर्ता श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी रात्री उशिरापर्यंत ‘श्री’ची प्रतिष्ठापना केली.

Devotional installment of obstacles | विघ्नहर्त्याची भक्तिभावाने प्रतिष्ठापना

विघ्नहर्त्याची भक्तिभावाने प्रतिष्ठापना

अहमदनगर : ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून - ‘गणपती बाप्पांचा जयघोष’, ढोल, ताशांचा गजर, गुलालाची मुक्त उधळण, अशा मंगलमय वातावरणात जिल्ह्यात शुक्रवारी ठिकठिकाणी विघ्नहर्ता श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी रात्री उशिरापर्यंत ‘श्री’ची प्रतिष्ठापना केली.
‘एक गाव एक गणपती’
पारनेर : तालुक्यात सुमारे ७० गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवून ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनप्रसंगी काही भागात पावसाने तुरळक हजेरी लावली तरी दुष्काळाचे सावट गणेशोत्सवावर असल्याचे दिसून आले.
पारनेरसह निघोज, टाकळीढोकेश्वर, सुपा, जवळे, वाडेगव्हाण, वडझिरे, अळकुटी, गोरेगाव, राळेगणसिध्दी येथे उत्साहात गणेशाची स्थापना करण्यात आली. पारनेर शहरात जय भवानी मित्र मंडळ, संभाजीनगर मित्र मंडळ, जाणता राजा मित्र मंडळ, जीप-चालक मित्र मंडळ, गणपती गल्ली मित्र मंडळ, नवरत्न मित्र मंडळ, सागरदास मित्र मंडळ, संत गोरोबा कुंभार मित्र मंडळ, पिंपळेश्वर मित्र मंडळ, पराशर मित्र मंडळ,विघ्नहर्ता मित्र मंडळ, भैरवनाथ मित्र मंडळ, क्रांती चौक मित्र मंडळ, पद्मावती मित्र मंडळ, काशी विश्वेश्वर मित्र मंडळ, नो चँलेज मित्र मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ, पाटाडी मळा, नवयुग मित्र मंडळ व नागेश्वर मित्र मंडळांनी ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना केली. दरवर्षी पारनेरच्या मुख्यपेठेतून मिरवणूक काढून अनेक गणेश मंडळे प्रतिष्ठापना करीत होते. मात्र यावर्षी एक ते दोन मंडळे वगळता इतरांनी मिरवणूक न काढणेच पसंत केले.
श्रीगोंद्यात मूर्ती खरेदीसाठी गर्दी
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरासह तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. वरुणराजाने जलवर्षाव केल्याने गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. श्रीगोंदा येथील कुंभारवाड्यात गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली होती. पन्नास रुपयापासून ते २१ हजारापर्यंत गणेश मूर्र्तींच्या किंमती होत्या. जयमल्हारच्या वेषातील गणरायाच्या मूर्र्तींना मागणी होती.

Web Title: Devotional installment of obstacles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.