सारोळा कासार सोसायटीच्या निवडणुकीत धामणे गटाचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:19 AM2021-04-05T04:19:03+5:302021-04-05T04:19:03+5:30
सारोळा सोसायटीसाठी शनिवारी (दि.३) मतदान होऊन सायंकाळी उशिरा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये लोकशाही विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी ...
सारोळा सोसायटीसाठी शनिवारी (दि.३) मतदान होऊन सायंकाळी उशिरा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये लोकशाही विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघात असलेल्या ८ जागांमध्ये संजय रावसाहेब काळे, गोरक्षनाथ रामदास काळे, जयप्रकाश भास्कर पाटील, बापूराव विठ्ठल धामणे, महेश एकनाथ धामणे, बाळकृष्ण भिमाजी धामणे, बाळासाहेब नाथा धामणे, नाना धोंडीभाऊ कडूस तर महिला राखीव मतदार संघात मनीषा शिवाजी कडूस, कमल एकनाथ कडूस, इतर मागासवर्ग मतदार संघातून संजय आप्पासाहेब धामणे, भटक्या विमुक्त जाती मतदार संघात शिवाजी बाबुराव वाव्हळ, अनुसूचित जाती मतदार संघातून चंद्रभान फकिरा जाधव हे १३ उमेदवार विजयी झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण आव्हाड यांनी काम पाहिले. तर संतोष वासकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना सोसायटीचे सचिव महादेव ठाणगे, सतीश कडूस व कर्मचाऱ्यांनी सहाय्य केले.
----------------------
प्रतिष्ठेच्या लढतीत धामणे यांची बाजी
सारोळा कासार सोसायटी निवडणुकीकडे आणि विशेषतः इतर मागासवर्ग मतदार संघातील शिक्षक नेते संजय धामणे विरुद्ध पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर धामणे यांनी या लढतीत बाजी मारत रवींद्र कडूस यांचा पराभव केला.