ढोकी तलावाला मोठी गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:56 AM2017-09-28T11:56:21+5:302017-09-28T11:56:21+5:30
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील काळू नदीवरील ढोकी तलाव दोनला मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून यामुळे तलावातील पाणीसाठा लवकर संपण्याची चिन्हे आहेत.
ट ाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील काळू नदीवरील ढोकी तलाव दोनला मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून यामुळे तलावातील पाणीसाठा लवकर संपण्याची चिन्हे आहेत. या तलावाची साठवण क्षमता ११५ दशलक्ष घनफूट आहे. परिसरातील टाकळी ढोकेश्वर, ढोकी, वासुंदे काकणेवाडी या गावांना उपसा जलसिंचनाच्या माध्यमातून ३५३ हेक्टर क्षेत्राला या तलावाचा फायदा होतो. तलावाच्या सांडव्याच्या आतील बाजूस तलावातून मोठ्या प्रमाणावर गळती चालू असून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. तलावाची गळती न थांबविल्यास हे पाणी उन्हाळ्याच्या आत संपवू शकते, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे तलाव सात वर्षांनी ओव्हरफ्लो झाला आहे. परंतु जलसंधारण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास शेतकºयांची मोठी हानी होऊ शकते.पाटबंधारे विभागाने तातडीने दखल घेऊन पाण्याची गळती थांबवावी, अशी मागणी परिसरातील चारही गावांमधून जोर धरू लागली आहे.---तलाव सात वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्याच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणात गळती सुरु असल्याने लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष घालून गळती थांबवावी जेणेकरून भविष्यात परिसरातील शेतकºयांना पाण्याची अडचण भासणार नाही व उन्हाळ्यातही शेतीला पाण्याचा फायदा होईल. -महेश पाटील,शेतकरी -------------------------------------------------------------------------------------------यासंदर्भात अधीक्षक अभियंता, प्राधिकरण विभाग, नाशिक यांना प्रस्ताव सादर केला असून पाठपुरावा सुरु आहे. य साठी अभियंता प्रत्यक्ष तलाव पाहणीसाठी येणार आहेत. -रामराजे भोसले, उपविभागीय अभियंता, अहमदनगर -------------------------------------------------------------------------------------------(फोटो २८ टाकळी १,२)- ढोकी नंबर दोन तलावाच्या सांडव्याखालून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरु आहे.