गालावर दाढी.... पिळदार मिशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 10:53 PM2017-09-06T22:53:59+5:302017-09-06T22:53:59+5:30
सुदाम देशमुख अहमदनगर : गालावर काळीभोर दाढी... पिळदार मिशी...चंद्रकोर टिळा...गळ््यात रुद्राक्षांच्या माळा... उंच जाणारे भगवे ध्वज...हास्ययुक्त अदा... अन् वर जाणारे हात... ढोलवर पडणारी जोरदार थाप... त्यातून निघणारा निनाद...! सर्वच काही अप्रतिम...! ढोलवादन पाहण्यासाठी नगरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत तरुणांच्या नव्या आविष्काराला दाद दिली. उडत्या...वेगवान तालांना नगरकरांनी टाळ््या-शिट्यांची दाद दिली.
स दाम देशमुखअहमदनगर : गालावर काळीभोर दाढी... पिळदार मिशी...चंद्रकोर टिळा...गळ््यात रुद्राक्षांच्या माळा... उंच जाणारे भगवे ध्वज...हास्ययुक्त अदा... अन् वर जाणारे हात... ढोलवर पडणारी जोरदार थाप... त्यातून निघणारा निनाद...! सर्वच काही अप्रतिम...! ढोलवादन पाहण्यासाठी नगरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत तरुणांच्या नव्या आविष्काराला दाद दिली. उडत्या...वेगवान तालांना नगरकरांनी टाळ््या-शिट्यांची दाद दिली.बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत ढोलपथके हे खास आकर्षण राहिले. पारंपरिक वाद्यांच्या कलाविष्काराचे नगरकरांनी स्वागत केले. गतवर्षी पेशवा बाजीराव चित्रपटाची ढोल पथकांवर मोहिनी होती. बाजीरावच्या केशरचनेतच तरुणांनी ढोलवादन केले. चित्रपटाचा परिणाम ढोलपथकावर साहजिक होतो. बाहुबली आणि मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप यंदा तरुणाईवर पडली. गालावरची काळी दाढी, पिळदार मिशी, कपाळावर चंद्रकोर टिळा, गळ््यात सोनेरी मुलामा असलेल्या रुद्राक्षांच्या माळा असा तरुणाईचा वेश होता. पथकांची वेशभूषा वेगवेगळी होती. कोणी तुरेदार फेटे घातले होते, तर कोणी स्टाईलीश केशरचना करून आकर्षित करून घेतले. तरुणांप्रमाणेच तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. चंद्रकोर टिकली, नथ, हातात रुद्रांक्षाच्या माळा, गळ््यात उपरणे परिधान करून तरुणींनी तरुणांच्या बरोबरीने ढोलवादन केले. रुद्रवंशने ढोलवर घुंगरू लावण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग केला. त्यामुळे टिपरू, थापी आणि घुंगरू असा तिहेरी संगम असलेला निनाद वातावरणात उत्साह निर्माण करून गेला. रुद्रनादने हैदराबादसह ग्रामीण भागात ढोलवादन केले.हास्ययुक्त हावभाव करीत वर जाणारे हात आणि जोरदारपणे ढोलवर थाप पडल्यानंतर पथकांमध्ये एक वेगळाच थरार निर्माण व्हायचा. वेगाच्या तालांना मोठा प्रतिसाद मिळत गेला. रुद्रनाद, रुद्रवंश,शौर्य, पद्मनाभम्, ºिहदम, कपिलेश्वर, तालयोगी, निर्विघ्नमं आदी पथकांनी मिरवणुकीत सहभाग घेऊन ढोलवादन केले. आता या ढोलपथकांना नवरात्रीचे वेध लागले असून ग्रामीण भागातूनही मागणी केली जात आहे. काही तरुणांनी छातीवर तिरंगा बॅच, तर काही तरुणांनी हातावर टॅटूही करून घेतले होते. काही पथकांमध्ये झांजचे आकर्षण होते. एका कानात बाळी लावण्याची प्रथाही काही तरुणांनी जपलेली दिसली. तरुणींच्या नथीमुळे पथकात पारंपरिकपणा भावला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालिकेमधील शीर्षक गीत, वक्रतुंड महाकाय, अशा स्तोत्रांचा जयघोषही वादनाच्या प्रारंभी निनादला. त्यालाही प्रेक्षकाची दाद मिळत गेली.