मुख्यमंत्र्यांनी पार्सल कंपनी काढली का?-अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 04:47 PM2019-10-16T16:47:57+5:302019-10-16T16:49:04+5:30
मुख्यमंत्र्यांनी राज्याचा गाडा हाकायचा सोडून पार्सल पाठवण्याची कुरिअर कंपनी काढली आहे काय? कोणाचे पार्सल कुठे पाठवायचे ते जनता ठरवेल, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
राशीन : मुख्यमंत्र्यांनी राज्याचा गाडा हाकायचा सोडून पार्सल पाठवण्याची कुरिअर कंपनी काढली आहे काय? कोणाचे पार्सल कुठे पाठवायचे ते जनता ठरवेल, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
कर्जत-जामखेड मतदार संघातील महाआघाडीचे उमेद्वार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी राशीन येथील जाहीर सभेत बोलत होते. उपसरपंच शंकर देशमुख अध्यक्षस्थानी होते. पवार म्हणाले, कर्जत-जामखेडकरांच्या विश्वासाला रोहित तडा जाऊ देणार नाही. सत्ताधा-यांकडून जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती झाली नाही. अंबालिकाने नगर जिल्ह्यात उसाला सर्वात जास्त बाजारभाव दिला. कर्ज फिटले तर आणखी जास्त भाव देणार. मुख्यमंत्र्यांच्या बगलबच्यांनी त्यांच्याकडे असलेल्या कारखान्यांची काय अवस्था करून टाकली आहे. मात्र स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुस-याचे बघायचे वाकून हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही.
यावेळी रोहित पवार, पांडुरंग मेरगळ, शिवकुमार सायकर, सचिन खरात, बापूसाहेब चव्हाण, राजेंद्र गुंड, कल्याण आखाडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजेंद्र फाळके, किशोर मासाळ, काकासाहेब तापकीर, पांडुरंग मेरगळ, हेमंत मोरे, विजय मोढळे, राजेंद्र गुंड, शाम कानगुडे, शहाजी राजेभोसले, शाहुराजे भोसले, सुनील शेलार, नानासाहेब निकत, सचिन खरात, विमलताई आनारसे, श्रीहर्ष शेवाळे, अशोक सरकाळे, सुदाम निकत, माउली सायकर,अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.