उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडून काढला डिझेल प्रकरणाचा तपास: आता तपासी अधिकारी संदिप मिटके 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 01:12 PM2020-11-09T13:12:46+5:302020-11-09T13:13:41+5:30

नगर शहरात २६ ऑक्टोबर रोजी पकडलेल्या बनावट डिझेल प्रकरणाचा तपास तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडून काढून घेत श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्याकडे देण्यात आला आहे. 

Diesel case investigated by Deputy Superintendent Vishal Dhume: Now investigating officer Sandeep Mitke | उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडून काढला डिझेल प्रकरणाचा तपास: आता तपासी अधिकारी संदिप मिटके 

उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडून काढला डिझेल प्रकरणाचा तपास: आता तपासी अधिकारी संदिप मिटके 

अहमदनगर : नगर शहरात २६ ऑक्टोबर रोजी पकडलेल्या बनावट डिझेल प्रकरणाचा तपास तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडून काढून घेत श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्याकडे देण्यात आला आहे. 

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला गती न मिळाल्यानेच हा तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ढुमे यांच्याकडून मिटके यांच्याकडे दिल्याची चर्चा आहे. तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या पथकाने २६ ऑक्टोबर रोजी शहरातील जीपीओ चौक परिसरात छापा टाकून १ हजार ९३७ लिटर बनावट डिझेल जप्त केले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे देण्यात आला होता. हे प्रकरण गंभीर असतानाही गेल्या पंधरा दिवसांत या गुन्ह्यात केवळ दोघांचा अटक झालेली आहे. 

पहिल्या आरोपीला तर घटनेच्या दिवशीच अटक झाली होती. त्यानंतर या प्रकारणात ढुमे यांच्या पथकाने जामखेड येथील एकास अटक केली़. त्यानंतर तपासात विशेष काही प्रसंगी दिसून आली नाही.

 ढुमे यांच्या तुलनेत उपाधीक्षक संदिप मिटके यांना जिल्ह्यात कामाचा अनुभव जास्त असल्याने हा तपास त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला  असल्याचे समजते.


 

Web Title: Diesel case investigated by Deputy Superintendent Vishal Dhume: Now investigating officer Sandeep Mitke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.