कापूस खरेदी केंद्रावर मापात तफावत; शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 06:02 PM2021-01-23T18:02:13+5:302021-01-23T18:02:25+5:30

शेवगाव तालुक्यातील दिवटे येथील एका शेतकऱ्याने आपला कापूस फेडरेशनच्या अमरापूर येथील खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेला. यावेळी येथील वजन काट्यावर रिकाम्या टेम्पोच्या वजनात तफावत आढळल्याने यात आपली फसवणूक केल्याची लेखी तक्रार संबंधित शेतकऱ्याने तहसीलदार व शेवगाव पोलिसांकडे केली आहे.

Differences in measurements at cotton shopping centers; The farmer lodged a complaint with the police | कापूस खरेदी केंद्रावर मापात तफावत; शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार

कापूस खरेदी केंद्रावर मापात तफावत; शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील दिवटे येथील एका शेतकऱ्याने आपला कापूस फेडरेशनच्या अमरापूर येथील खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेला. यावेळी येथील वजन काट्यावर रिकाम्या टेम्पोच्या वजनात तफावत आढळल्याने यात आपली फसवणूक केल्याची लेखी तक्रार संबंधित शेतकऱ्याने तहसीलदार व शेवगाव पोलिसांकडे केली आहे.

दिवटे येथील ॲड. प्रकाश आसाराम कणसे (वय ३०) यांनी कापूस विक्रीसाठी काही दिवसांपूर्वी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती फेडरेशनच्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. यानुसार सदरील फेडरेशनकडून १७ जानेवारी रोजी फोन करून संबंधित शेतकऱ्यास कापूस घेऊन अमरापूर येथील आनंद काॅटन अँड जिनींग मील येथे बोलावले. त्यावेळी कणसे यांनी सोमवारी (दि.१८) गणेश जगताप यांच्या मालकीच्या भाडोत्री टेम्पो क्रमांक (एम.एच.-१५ एजी ८२८७) मधून कापूस अमरापूर येथे नेला. याठिकाणी कापूस भरलेल्या टेम्पोचे वजन ६२ क्विंटल १५ किलो भरले. त्यानंतर रिकाम्या टेम्पोचे वजन केले असता ते ३० क्विंटल ५५ किलो भरले. यावेळी संबंधित शेतकऱ्यास रिकाम्या टेम्पोच्या वजनात तफावत असल्याचा संशय आला. तेव्हा त्यांनी सदरील रिकाम्या टेम्पोचे वजन साई वे ब्रिज या खासगी वजनकाट्यावर केले असता ते २९ क्विंटल ७० किलो भरले. पुन्हा अधिकच्या खात्रीसाठी त्यांनी मार्केट कमिटीच्या ॲग्रील प्रोड्यूस येथील काट्यावर वजन केले तर ते २९ क्विंटल ६५ किलो भरले. सदरील दोन्ही ठिकाणच्या व कापूस खरेदी केंद्रावरील काट्यात ८५ ते ९० किलोची तफावत आढळून आली. याबाबत प्रकाश कणसे यांनी संबंधित जिनींग चालक व ग्रेडर यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. परंतु, संबंधितानी उडवाउडवीची उत्तरे देऊन सदरील वजनाची भरपाई देण्यास नकार दिला, अशी लेखी तक्रार कणसे यांनी तहसीलदार व शेवगाव पोलिस स्टेशनला दिली आहे. संबंधितावर त्वरित गुन्हे दाखल करून फसवणुकीची रक्कम देण्याची मागणी केली आहे.

 

Web Title: Differences in measurements at cotton shopping centers; The farmer lodged a complaint with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.