सीटीएसमुळे धनादेश वटण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 08:08 PM2018-04-27T20:08:10+5:302018-04-27T20:15:38+5:30

भारतीय रिझर्व्ह बँकेने धनादेश वटण्याच्या पारंपरिक प्रक्रियेत नव्याने काही बदल केले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेसह इतर सहकारी बँकांचे धनादेश वटण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

Difficulties in passing checks due to CTS | सीटीएसमुळे धनादेश वटण्यात अडचणी

सीटीएसमुळे धनादेश वटण्यात अडचणी

ठळक मुद्देग्राहकांची पिळवणूक नोकरदार, विमाधारक, कामगार ग्राहकांना त्रास

अहमदनगर : भारतीय रिझर्व्ह बँकेने धनादेश वटण्याच्या पारंपरिक प्रक्रियेत नव्याने काही बदल केले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेसह इतर सहकारी बँकांचे धनादेश वटण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या बँकांचे धनादेश भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखा कार्यालयांमध्ये देखील स्वीकारले जात नाहीत. त्याचा त्रास नोकरदार, कामगार, विमा पॉलिसीधारक व सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

रिझर्व्ह बँकेने चेक ट्रंकेशन सिस्टीम (सी.टी.एस.) ही नवीन प्रणाली लागू केली आहे. रिझर्व्ह बँकेने अगोदरच याबाबत निर्देश देऊनही सहकारी व इतर काही बँकांनी याबाबतची पूर्वतयारी केली नव्हती. १ एप्रिलपासून सी. टी. एस. प्रणालीची राष्ट्रीयीकृत बँकांनी अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली. या प्रणालीनुसार ग्राहकाने दिलेला धनादेश (चेक) पूर्वीप्रमाणे टपालातून (मॅन्युअली) एका शाखेतून दुसऱ्या शाखेस पाठविण्याऐवजी ज्या बँकेत धनादेश भरला, त्याच बँकेतून तो स्कॅन होऊन ज्या शाखेच्या नावे धनादेश असेल, त्या शाखेत तो त्याचक्षणाला संगणकीय यंत्रणेमार्फत पाठवून त्याची काही क्षणातच पडताळणी केली जाते. पडताळणी होताच, हा धनादेश वटविला जातो. या पद्धतीनुसार धनादेश वटविण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे धनादेश तयार करण्यात आले आहेत. ग्राहकाचे नाव छापूनच त्याला धनादेश पुस्तिका दिल्या जात आहेत. हा धनादेश स्कॅन करून बँकेचा कोड व इतर तपशीलासह रिझर्व्ह बँक व संबंधित बँकेत संगणकीय यंत्रणेद्वारे तो पोहोचून त्याची वर्गवारी, पडताळणी झाल्यानंतरच तो ताबडतोब वटविला जात आहे. सीटीएस प्रणालीनुसार एमआयसीआर धनादेशाद्वारेच व्यवहार सुरू झाल्याने जुने धनादेश बाद झाले आहेत.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अगोदरपासूनच कोअर बँकिंग प्रणालीचा अवलंब सुरू केलेला आहे. १५ दिवसांपासून बँकेत सीटीएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. संगमनेर, कोपरगाव, राहुरीसह बºयाच ठिकाणी ही प्रणाली सुरू केली आहे. काही शाखांमध्ये लवकरच ती सुरू होणार आहे. सुरुवातच असल्याने काही प्रमाणात विस्कळीतपणा आला आहे. येत्या काही दिवसात या प्रणालीनुसार व्यवहार सुरळीत होतील. जिल्हा बँकेच्या २८६ शाखा आहेत. त्या सर्वांना नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नव्या प्रणालीनुसार नवीन धनादेश छपाईची स्वतंत्रण यंत्रणा जिल्हा बँकेच्या मुख्यालयात सुरू करण्यात आली आहे.
-रावसाहेब वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा सहकारी बँक, अहमदनगर.

 

Web Title: Difficulties in passing checks due to CTS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.