पिकांची ऑनलाइन नोंद लावणे अडचणीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:25 AM2021-09-15T04:25:12+5:302021-09-15T04:25:12+5:30
ई-पीकपाहणी ॲपद्वारे आपल्या पिकांची ऑनलाइन नोंद लावण्यासाठी मोबाइलमध्ये ई-पीकपहाणी ॲप डाऊनलोड करावे लागत आहे. हे ॲप डाऊनलोड करण्यापासून ते ...
ई-पीकपाहणी ॲपद्वारे आपल्या पिकांची ऑनलाइन नोंद लावण्यासाठी मोबाइलमध्ये ई-पीकपहाणी ॲप डाऊनलोड करावे लागत आहे. हे ॲप डाऊनलोड करण्यापासून ते त्यात माहिती भरण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यात माहिती भरण्याची किचकट प्रक्रिया करावी लागते. कोणते पीक आहे त्याची माहिती ॲपवर नोंद करावी लागते. त्यासाठी पिकाचा फोटो अपलोड करावा लागत आहे. सर्वसाधारणपणे अनेक शेतकरी अडाणी आहेत. तरुण व शिक्षित शेतकऱ्यांना हे ॲप वापरता येईल. मात्र, अडाणी शेतकऱ्यांना हे ॲप वापरता येणे अवघड आहे. अनेकदा मोबाइलला रेंज येत नसते. पीकनोंद लावताना आलेल्या अडचणीसंदर्भात ०२०२५७१२६१२ या हेल्पलाइन क्रमांकावर फोन लावला तर फोन लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागायची, असा सवाल सातपुते यांनी केला आहे.
140921\141-img-20210914-wa0038.jpg
दहिगावने - पासपोर्ट फोटो बंडू सातपुते